मुंबई बातम्या

मुंबई महापालिका औषध खरेदीची चौकशी करणार : मुख्यमंत्री – Pudhari

नागपूर, पुढारी वृत्‍तसेवा : मुंबई महापालिकेत यापुर्वीच्या काळात औषध खरेदीत चूकीच्या बाबी घडल्या आहेत. तसेच औषध दिरंगाई झाली या सगळ्याची चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. मुंबई कांदिवली येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सर्वसाधारण महापालिका रुग्णालयातील सोई सुविधांचा अभाव असल्याकडे लक्षवेधीत भाजप आमदार ॲड. आशिष शेलार यांनी तारांकित प्रश्न उपस्थितीत केला होता.

आमदार ॲड. आशिष शेलार यांनी या रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरणार का? चुकीची औषध खरेदी व औषध दिरंगाई झाली त्याची चौकशी करणार का? असे प्रश्न उपस्थितीत केले. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी चौकशी करण्याचे मान्य करुन, रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील अशी ग्वाही दिली. आमदार ॲड. आशिष शेलार यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे 5000 स्वच्छता दूत जसे नियुक्त करण्यात येणार आहेत त्याच प्रमाणे 5500 आशा वर्कर्सची भरती करण्यात येईल, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.

या रुग्णालयाबाबतीत सविस्तर चर्चा करण्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्याची मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी केली तीही मुख्यमंत्र्यांनी मान्य केली. पश्चिम उपनगरातील सेव्हन हिल्स रुग्णालय महापालिकेने ताब्यात घ्यावे, अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी केली. ती मान्य करीत याबाबत महापालिकेला सूचना करण्यात येतील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

हेही वाचा : 

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiigFodHRwczovL3B1ZGhhcmkubmV3cy9tYWhhcmFzaHRyYS92aWRhcmJoYS80MTEyNjgvbXVtYmFpLW11bmljaXBhbC1jb3Jwb3JhdGlvbi1pbnZlc3RpZ2F0ZS1kcnVnLXB1cmNoYXNlLWNtLXNoaW5kZS1hbm5vdW5jZW1lbnQtYXNzZW1ibHkvYXLSAYoBaHR0cHM6Ly9wdWRoYXJpLm5ld3MvbWFoYXJhc2h0cmEvdmlkYXJiaGEvNDExMjY4L211bWJhaS1tdW5pY2lwYWwtY29ycG9yYXRpb24taW52ZXN0aWdhdGUtZHJ1Zy1wdXJjaGFzZS1jbS1zaGluZGUtYW5ub3VuY2VtZW50LWFzc2VtYmx5L2Fy?oc=5