मुंबई बातम्या

लग्नाचा दिवस करा आणखी स्पेशल, या ट्रेन्डिंग ड्रेसमध्ये दिसेल नवरा मुलगा सर्वात भारी, Video – News18 लोकमत

मुंबई, 18 डिसेंबर :  लग्न ठरलं की सगळ्यात आधी लग्नात कोणते कपडे घालणार याचा विचार केला  जातो.  नवा ट्रेंड काय आहे हे पाहिलं जातं.  वेगळं काहीतरी तयार करता येईल का हे विचारात घेतलं जातं. लग्नात वराकडे सगळ्यांचं विशेष लक्ष असतं त्यामुळे मुंबईच्या मार्केटमध्ये याबाबतचा कोणता विशेष कसला ट्रेंड सुरु आहे पाहूयात.

थीमनुसार कपडे

लग्नातील कार्यक्रमाच्या थीमनुसार आता कपडे निवडले जातात. लग्नसमारंभ असला म्हणजे 6-7 कार्यक्रम एकाचवेळी असतात म्हणून त्यानुसार कपडे घेतले जातात. मेंदीच्या कार्यक्रमाला मेंदी रंगाचा किंवा हिरव्या शेडचा ड्रेस निवडला जातो.  हळदीच्या कार्यक्रमाला पिवळ्या शेडचे ड्रेस घेतले जातात.  साखरपुड्याला डिझाईनर ड्रेस निवडले जातात.  संगीतच्या कार्यक्रमाला गडद रंगाचे ड्रेस निवडले जातात. तर,  लग्नाच्या दिवशी पेस्टल कलरचा ड्रेसला पसंती असते. पेशवाई, शेरवानी, 3 लेयर,               कुर्ता-पायजमा या ड्रेसचा ट्रेंड सध्या सुरु आहे.

मुलांसाठी ड्रेस खरेदी करण्यापूर्वी पाहा हे ऑप्शन, तुमचं बाळ दिसेल गोंडस, Video

पेशवाईची विशेष फॅशन

सध्या नवरी मुलगी पेशवाई दागिने , नऊवारी साड्या लग्नसमारंभात नेसणं पसंत करते. त्यामुळे त्यावर सूट होतील असे नवरदेवाचे कपडे आहेत. घेरदार डिझाईनर सदरा, पायजमा,ओढणी त्यावर दागिने असा ड्रेसचा संपूर्ण सेट दुकानात विक्रीसाठी उपलब्ध आहे. तसेच हे शर्ट फिक्या आणि पेस्टल रंगाचे असतात. तसेच नवरदेवाच्या कपड्यांना मिळत्या जुळत्या रंगाचे कपडे नवरदेवाचे मित्र, भावंडं, परिवारातील इतर सदस्य घालतात. तसेच पेशवाई बुट, फेटा सुद्धा कॉन्ट्रस्ट रंगाचा निवडला जातो.

काय आहे किंमत?

हे कपडे डिझाईनर असतात. यावर जरीचं, डायमंडच, मोतीचं वर्क केलेलं असतं त्यामुळे या कपड्यांची किंमत जरा महागच असते. 10 हजार ते 2 लाखांपर्यंत यावर्षी बाजारात नवरदेवाचे कपडे उपलब्ध आहेत.

लग्नात साडीवर मॅचिंग ब्लाऊज हवंच! मुंबईत हा ट्रेन्ड आहे सुपरहिट, पाहा Video

दोन वर्षांनी लग्नसमारंभ उत्साहात सुरु आहे त्यामुळे लोकांची हौस जरा वेगळीच आहे. त्यामुळे खरेदीचासुद्धा बजेट जरा वाढला आहे. त्यामुळे ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय असं मुंबईतील दादर सुविधा क्लोथचे कर्मचारी प्रतिश मारू यांनी सांगितलं.

गुगल मॅपवरून साभार

संपर्क क्रमांक

096191 56434

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMijAFodHRwczovL2xva21hdC5uZXdzMTguY29tL2xpZmVzdHlsZS93ZWRkaW5nLXNlYXNvbi0yMDIyLWRpZmZlcmVudC10eXBlcy1vZi1kcmVzcy1mb3ItZ3Jvb20tZm9yLW1hcnJpYWdlLWRheS1pbi10aGUtbWFya2V0LW11bWJhaS04MDEyNjQuaHRtbNIBkAFodHRwczovL2xva21hdC5uZXdzMTguY29tL2FtcC9saWZlc3R5bGUvd2VkZGluZy1zZWFzb24tMjAyMi1kaWZmZXJlbnQtdHlwZXMtb2YtZHJlc3MtZm9yLWdyb29tLWZvci1tYXJyaWFnZS1kYXktaW4tdGhlLW1hcmtldC1tdW1iYWktODAxMjY0Lmh0bWw?oc=5