मुंबई बातम्या

बॉयफ्रेंडसमोरच गर्लफ्रेंडवर बलात्कार; नवी मुंबईत प्रसिद्ध बालाजी मंदिर परिसरातील घटना – Zee २४ तास

स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : बॉयफ्रेंडसमोरच गर्लफ्रेंडवर बलात्कार(Girlfriend raped in front of boyfriend) झाल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईतील(Navi Mumbai ) नेरुळ(Nerul) परिसरात घडली आहे. विशेष म्हणजे मैदानात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेला चार दिवस उलटले तरी अद्याप आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही. यामुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. 

पीडित ही 16 वर्षाची अल्पवयीन मुलगी आहे. ती महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.  नेरुळ सेक्टर 22 येथील बालाजी मंदिरा समोरील मैदानात या तरुणीवर बलात्कार करण्यात आला आहे.  सदर पीडित तरुणी तिच्या बॉफ्रेंडसह रात्रीच्या वेळी गार्डन मध्ये बसली होती. यावेळी तेथे आलेल्या एका तरुणाने पीडितेच्या बॉफ्रेंडला दमदाटी करुन पळवून लावले. यानंतर नराधमाने तरुणीवर बलात्कार केला. 

या घटनेनंतर मुलीने घर गाठून सर्व हकीकत आपल्या कुटुंबियांना सांगितली. कुटुंबियांनी प्राथमिक उपचार करुन नेरुळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात इसमा विरोधात पोस्को अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. 
मात्र, 4 दिवस उलटले तरी अद्याप बलात्कार करणाऱ्या आरोपीला अटक झालेली नाही. यामुळे पीडितेच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त केला आहे. 

नेरुळमधील बालाजी मंदिर हे नवी मुंबईतील प्रसिद्ध तीर्थ स्थळ आहे. बालाजी मंदिर परिसरात असलेल्या मैदानाजवळ ही बलात्काराची घटना घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. मैदानाजवळ कुणी सुरक्षा रक्षक तैनात नव्हता का? तसेच पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMibmh0dHBzOi8vemVlbmV3cy5pbmRpYS5jb20vbWFyYXRoaS9tdW1iYWkvZ2lybGZyaWVuZC1yYXBlZC1pbi1mcm9udC1vZi1ib3lmcmllbmQtaW4tbmVydWwtbmF2aS1tdW1iYWktdmsvNjc2MjU30gFyaHR0cHM6Ly96ZWVuZXdzLmluZGlhLmNvbS9tYXJhdGhpL211bWJhaS9naXJsZnJpZW5kLXJhcGVkLWluLWZyb250LW9mLWJveWZyaWVuZC1pbi1uZXJ1bC1uYXZpLW11bWJhaS12ay82NzYyNTcvYW1w?oc=5