मुंबई बातम्या

Bombay High Court | दसरा मेळावा एसटी बूक प्रकरणात मुंबई उच्च… – Policenama

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर पहिल्यांदाच मुंबईत एकाच पक्षाचे दोन दसरा मेळावे (Dasara Melava 2022) पार पडले. दादरच्या शिवाजी पार्कवर (Shivaji Park) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा तर वांद्र्याच्या बीकेसी मैदानावर (BKC Ground) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा दसरा मेळावा झाला. बीकेसी मैदानावरील दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी शिंदे गटाने तब्बल 1700 एसटी बसेसचं बुकिंग केलं होतं. यासाठी 10 कोटी रुपये भरण्यात आले होते. गर्दी जमवणे आणि खर्चावरुन मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) शिंदे गटाला धक्का दिला आहे. 10 कोटी खर्चाच्या चौकशी प्रकरणाच्या याचिका आता जनहित याचिकेत रुपांतर (Public Interest Litigation) करुन दुसऱ्या खंडपीठासमोर पाठवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) दिले आहेत.

शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटामध्ये गर्दी जमवण्यासाठी चांगलीच शर्यत रंगली होती.
राज्यभरातून समर्थकांना मुंबईत आणण्यासाठी शिंदे गटाने तब्बल 1700 एसटी बसेसचं बुकिंग करण्यात आले होते.
यासाठी दहा कोटी रुपये रोख भरले होते. या प्रकरणी शिंदे गाटला मुंबई उच्च न्यायालयाने झटका दिला आहे.
शिंदे गटातील बीकेसी दसरा मेळाव्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेला जनहित याचिकेत रुपांतर करुन दुसऱ्या खंडपीठासमोर पाठवण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत.

दसरा मेळाव्यासाठी बीकेसीमध्ये आयोजनासाठी दहा कोटी रुपये रोख एसटी महामंडळाला (ST Corporation) देण्यात आले होते.
या याचिकेत आयकर विभागामार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती.
वरिष्ठ वकील नितीन सातपुते (Senior Adv. Nitin Satpute) यांनी ही याचिका दाखल केली होती.
मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) आज सुनावणी दरम्यान याचिकाकर्ता
यांना न्यायमूर्ती अजय गडकरी (Justice Ajay Gadkari) आणि
न्यायमूर्ती प्रकाश नाईक (Justice Prakash Naik) यांच्या खंडपीठाने निर्देश दिले आहेत.

Web Title :- Bombay High Court | public interest litigation against shinde group in 10 crore st book case mumbai court decision

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune CP Retesh Kumaarr | रितेश कुमार यांनी स्विकारली पुणे पोलिस आयुक्तपदाची सूत्रे (VIDEO)

Sanjay Raut | “कुणालाही हे मान्य नाही की राजभवनात बसून…”, संजय राऊतांची राज्यपालांवर टीका

Governor Appointed MLA | राज्यपाल नियुक्त आमदारांची सुनावणी लांबणीवर, विधानपरिषद सभापतीपदाच्या निवडणुकीत ट्विस्ट

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiiAFodHRwczovL3BvbGljZW5hbWEuY29tL2JvbWJheS1oaWdoLWNvdXJ0LXB1YmxpYy1pbnRlcmVzdC1saXRpZ2F0aW9uLWFnYWluc3Qtc2hpbmRlLWdyb3VwLWluLTEwLWNyb3JlLXN0LWJvb2stY2FzZS1tdW1iYWktY291cnQtZGVjaXNpb24v0gEA?oc=5