मुंबई बातम्या

शिंदे गटाला जबर धक्का, दसऱ्याला 10 कोटी एसटी बूक प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय – News18 लोकमत

मुंबई, 16 डिसेंबर : बाळासाहेबांची शिवसेनेनं मुंबईतील बीकेसी मैदानावर भव्य असा दसरा मेळावा आयोजित केला आहे. पण, या मेळाव्याला गर्दी जमवणे आणि खर्चावरून हायकोर्टाने शिंदे सरकारला धक्का दिला आहे. 10 कोटी खर्चाच्या चौकशी प्रकरणाच्या याचिका आता जनहित याचिकेत रूपांतर करून दुसऱ्या खंडपीठासमोर पाठवण्याचे निर्देश दिले आहे.

शिवसेना आणि शिंदे गटामध्ये गर्दी जमवण्यासाठी चांगलीच शर्यत रंगली होदती. राज्यभरातून समर्थकांना मुंबईत आणण्यासाठी शिंदे गटाने तब्बल 1700 एसटी बसेसचं बुकिंग केलं होतं. यासाठी तब्बल 10 कोटी रुपये रोख भरले होते. या प्रकरणी शिंदे गटाला मुंबई उच्च न्यायालयाचा झटका दिला आहे. शिंदे गटातील BKC दसरा मेळाव्या विरोधात दाखल केलेली याचिकेला जनहित याचिकेत रूपांतर करून दुसऱ्या खंडपीठासमोर पाठवण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहे.

(बीडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का, भाजपने मिळवली एक हाती सत्ता)

दसरा मेळावाच्या बीकेसीमध्ये आयोजनासाठी दहा कोटी रुपये नगद एसटी महामंडळाला देण्यात आले होते. या याचिकेत आयकर विभागाद्वारे चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती. वरिष्ठ वकील नितीन सातपुते यांनी ही याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी दरम्यान याचिकाकर्ता यांना न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने निर्देश दिले आहे.

काय आहे प्रकरण?

शिवसेनेला टक्कर देत शिंदे गट मुंबईतील बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेतला होता . या मेळाव्याच्या निमित्ताने शिंदे गटाने जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. शिंदे गटाकडून राज्यभरातून समर्थकांना मुंबईत आणले होते. शिंदे गटाकडून तब्बल 1700 हून अधिक लालपरी बसेसचं बुकिंग करण्यात आले होते.

( महाविकास आघाडीचा महामोर्चा निघणारच, पोलिसांकडूनही ग्रीन सिग्नल?)

यासाठी शिंदे गटाने तब्बल १० कोटी रुपये रोख भरले होते. ही रक्कम मोजण्यासाठी रविवार आणि सोमवार असे दोन दिवस लागले होते. आतापर्यंत प्रथमच इतकी मोठी बुकिंग एसटी महामंडळात झाली होती. एकाच वेळी इतकी मोठी रक्कम कशी देण्यात आली, याबद्दल प्रश्न उपस्थितीत झाले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMikAFodHRwczovL2xva21hdC5uZXdzMTguY29tL211bWJhaS9wdWJsaWMtaW50ZXJlc3QtbGl0aWdhdGlvbi1hZ2FpbnN0LXNoaW5kZS1ncm91cC1pbi0xMC1jcm9yZS1zdC1ib29rLWNhc2UtbXVtYmFpLWNvdXJ0LWRlY2lzaW9uLW1oc3MtODAwNzI3Lmh0bWzSAZQBaHR0cHM6Ly9sb2ttYXQubmV3czE4LmNvbS9hbXAvbXVtYmFpL3B1YmxpYy1pbnRlcmVzdC1saXRpZ2F0aW9uLWFnYWluc3Qtc2hpbmRlLWdyb3VwLWluLTEwLWNyb3JlLXN0LWJvb2stY2FzZS1tdW1iYWktY291cnQtZGVjaXNpb24tbWhzcy04MDA3MjcuaHRtbA?oc=5