मुंबई बातम्या

Mumbai : मुंबईतील अविघ्न इमारतीत 35 व्या मजल्यावर अग्नितांडव, रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवलं – News18 लोकमत

मुंबई, 15 डिसेंबर : मुंबईमध्ये पुन्हा एकदा इमारतीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. लालबाग परिसरातील वन अविघ्न पार्क या उच्चभ्रू सोसायटीमध्ये आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या दाखल आहे. आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, करी रोड परिसरातील वन अविघ्न पार्क सोसायटीमधील 35 व्या मजल्यावर आज सकाळी आग लागली.

आग लागल्यामुळे एकच खळबळ उडाली. रहिवाशांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे काम सुरू आहे.

या इमारतीमध्ये आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे. याआधीही मागील वर्षी

2021 मध्ये याअविघ्न सोसायटीतील इमारतीला आग लागली होती. 19 व्या मजल्यावरून एका मजुराचा पडून मृत्यू झाला होता. वर्षभरातनंतर पुन्हा एकदा अविघ्न इमारतीत आग लागली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMid2h0dHBzOi8vbG9rbWF0Lm5ld3MxOC5jb20vbXVtYmFpL2EtZmlyZS1icm9rZS1vdXQtaW4tYW4tb25lLWF2aWdobmEtcGFyay1idWlsZGluZy1pbi1sYWxiYWdoLWFyZWEtb2YtbXVtYmFpLTgwMDA5NS5odG1s0gF7aHR0cHM6Ly9sb2ttYXQubmV3czE4LmNvbS9hbXAvbXVtYmFpL2EtZmlyZS1icm9rZS1vdXQtaW4tYW4tb25lLWF2aWdobmEtcGFyay1idWlsZGluZy1pbi1sYWxiYWdoLWFyZWEtb2YtbXVtYmFpLTgwMDA5NS5odG1s?oc=5