मुंबई बातम्या

मुंबई महापालिकेने तब्बल 150 कोटींचा भूखंड गमावला; काँग्रेसचा गंभीर आरोप, थेट मुख्यमंत्र्यांना लिहलं पत्र – News18 लोकमत

मुंबई, 12 डिसेंबर : मुंबई महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे सुमारे 150 कोटी रूपयांचा भूखंड गमवावा लागला आहे. सोमवारी मुंबई हायकोर्टाने या प्रकरणी सुनावणी घेतल्यानंतर मुंबई महापालिकेला मोठा दणका दिला आहे. पालिका अधिकाऱ्यांनी जाणुनबुजून वेळकाढूपणा केला. जेणेकरुन जमीन मालकाला फायदा होईल, असा आरोप काँग्रेसने केला आहे. या प्रकरणामुळे आगामी महापालिका निवडणुकीत आघाडी होते की नाही? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.

खेळाच्या मैदानावरील आरक्षण हायकोर्टाने उठवले

दादर पूर्व येथील दादासाहेब फाळके रोडवरच्या 2 हजार चौरस मीटरच्या भूखंडावरील आरक्षण रद्द करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिला आहे. दादर पूर्व स्टेशनजवळच्या कैलास लस्सी समोरच्या खेळाच्या मैदानावरील आरक्षण हायकोर्टाने उठवले आहे. 10 वर्षांपूर्वी पर्चेस ऑर्डर देवूनही संबंधित भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया मुंबई महापालिकेने पूर्ण केली नसल्याने हायकोर्टाचा हा निर्णय दिला आहे. संबंधित भूखंडावर खेळाचे मैदान आरक्षण पडले होते आणि त्याबदल्यात जमीन मालकाला 9 कोटी 20 लाख पालिकेला द्यायचे होते. दुसरीकडे पालिका अधिकाऱ्यांनी जाणुनबुजून वेळकाढू धोरण राबवून जमीन मालकाला फायदा पोहचविण्यासाठी घोटाळा केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.

वाचा – ठाण्यातून मुंबईला जाणाऱ्यांचा प्रवास होणार गार, बेस्टची आजपासून नवीन प्रीमियम सेवा सुरू

महाविकास आघाडीचा मुंबई मोर्चा

महाराष्ट्रद्रोही विरोधात हल्लाबोल ही लाईन डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडी 17 डिसेंबरला मुंबईत विराट मोर्चा काढणार आहे. यासाठी ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांनी कार्यकर्त्यांना जमवण्यासाठी तयारीला सुरुवात केलीय. प्रत्येक पक्षाने एक लाखाचं टार्गेट ठेवून जवळपास तीन लाखांहून अधिक कार्यकर्ते जमवण्याचे टार्गेट ठेवलय. या ऐतिहासीक विराट मोर्चासाठी तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या बैठका सुरू झाल्यात. त्याच सोबत कार्यकर्त्यांना जमवण्यासाठी ही प्लॅनिंग करायला सुरुवात झालीय.

राज्यातील भाजपच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांनी मिळूनमहाविकास आघाडी स्थापन केली. मात्र, सत्तांतर झाल्यानंतर आता हीच महाविकास आघाडी आक्रमक भूमिका घेत विराट मोर्चाचं आयोजन करत आहे. येत्या 17 डिसेंबरला मुंबईत विराट असा मोर्चा काढण्यासाठी तीनही पक्षांनी चांगलीच कंबर कसलेली पाहायला मिळते. यासाठी तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकाही पार पडताना पाहायला मिळत आहे. मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडी मुंबईत मोठ शक्ती प्रदर्शन करू पाहत आहे. महाराष्ट्रद्रोही विरोधात हल्लाबोल या नावाने हे तीनही पक्ष एकत्र येऊन विराट असा मोर्चा काढणार आहे…

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMijQFodHRwczovL2xva21hdC5uZXdzMTguY29tL211bWJhaS9tdW1iYWktaGlnaC1jb3VydHMtYmxvdy10by1tdW1iYWktbXVuaWNpcGFsaXR5LWJtYy1sb3N0LXRoZS0xNTAtY3JvcmUtcGxvdC1vbi1kYWRhci1zdGF0aW9uLW1ocHItNzk4OTI2Lmh0bWzSAZEBaHR0cHM6Ly9sb2ttYXQubmV3czE4LmNvbS9hbXAvbXVtYmFpL211bWJhaS1oaWdoLWNvdXJ0cy1ibG93LXRvLW11bWJhaS1tdW5pY2lwYWxpdHktYm1jLWxvc3QtdGhlLTE1MC1jcm9yZS1wbG90LW9uLWRhZGFyLXN0YXRpb24tbWhwci03OTg5MjYuaHRtbA?oc=5