मुंबई बातम्या

Latest Marathi News | हरसूलच्या घाटात दुर्मिळ ‘Bombay Sheildtail’ चे दर्शनb – Sakal

नाशिक
sakal_logo

By

नाशिक : तुम्ही कधी बीळ बनविणारा साप बघितला आहे का? नाही ना…हरसूलमधील जंगलात दुर्मळ ‘बॉम्बे अर्थ स्नेक’ अर्थात, ‘बॉम्बे शील्डटेल’ सापाचे दर्शन झाले आहे. हे सर्प जगात भारत आणि श्रीलंकामध्ये आढळतात. पश्‍चिम घाट आणि आणि द्वीपकल्पीय भारताच्या काही भागात दिसणारा हा सर्प हरसूलमध्ये पाहावयास मिळाला. (Sighting of rare Bombay Sheildtail at Harsul Ghat Nashik Latest Marathi News)

‘शील्डटेल’ साप हे ‘युरोपेल्टीडे‘ कुटुंबातील आहेत. त्याच्या ५० हून अधिक प्रजाती आहेत. त्यांच्या शेपटीच्या टोकावर असलेल्या केराटिनस ढालवरून त्यांना नाव मिळते. हे सर्प बिनविषारी आहेत. भारतीय ‘हर्पेटोलॉजिस्ट’ डॉ. सुब्रमण्यम भूपती यांच्या ‘हर्पेटोलॉजी‘ क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा सन्मान करण्यासाठी हे नाव देण्यात आले.

पश्चिम घाटातील इतर अनेक प्रजातींप्रमाणे या जातीच्या सर्पाला वीट उद्योग, रोडकिल्स आणि संभाव्य प्राणघातक सापाच्या बुरशीजन्य रोगासारखे रोग यांच्याद्वारे मातीच्या शोषणामुळे अधिवास बदलासारख्या विशिष्ट धोक्यांना तोंड द्यावे लागते. सापांच्या या प्रजाती जमिनीतील नायट्रोजनच्या स्थिरीकरणात महत्त्वाची भूमिका बजावतात.

‘बॉम्बे शील्डटेल’ सापाची एकूण लांबी २९.५ सेंटीमीटर असून डोक्याच्या मागे १७ ओळींमध्ये गुळगुळीत पृष्ठीय ‘स्केल’ दिसतात. ओठांवर आणि मानेच्या बाजूला एक पिवळा पट्टा, त्यानंतर दोन ते पाच मोठे पिवळे ठिपके. शेपटीच्या प्रत्येक बाजूला एक पिवळा पट्टा दिसतो. शेपटीचा शेवट तिरकसपणे छाटलेला आहे.

हेही वाचा : Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

हेही वाचा: Nashik News: सर्वसाधारण सभापतीपदामुळे राजकारण रंगणार!; महिलांसाठी सोडतीव्दारे 10 सभापतीपदे आरक्षित

या कुटुंबातील ८ भिन्न प्रजाती ओळखल्या जातात. गांडुळे, कीटकांच्या अळ्या हे या सापाचे खाद्य आहे. निम्म्या पेक्षा अधिक आयुष्य हे साप जमिनीमध्ये राहतात. मगर, कासवप्रमाणे आदिकाळापासून या सापात फरक झाला नाही. अंडी पोटात ठेवून उबवून नंतर पिल्ले देणारा साप आहे.

“‘बॉम्बे शील्डटेल’ साप बीळ करणारा म्हणून त्याची ओळख आहे. महाराष्ट्रात कमी प्रमाणात हा साप दिसतो. सापाच्या प्रजनानाविषयी अभ्यास होणे आवश्‍यक आहे.”

– उमेशकुमार नागरे (निसर्ग अभ्यासक)

हेही वाचा: Clean Survey Scheme | स्वच्छ सर्वेक्षणात नाशिक जिल्हा राज्यात अव्वल : ZP CEO आशिमा मित्तल

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiggFodHRwczovL3d3dy5lc2FrYWwuY29tL3V0dGFyLW1haGFyYXNodHJhL25hc2hpay9zaWdodGluZy1vZi1yYXJlLWJvbWJheS1zaGVpbGR0YWlsLWF0LWhhcnN1bC1naGF0LW5hc2hpay1sYXRlc3QtbWFyYXRoaS1uZXdzLXBzbDk40gGGAWh0dHBzOi8vd3d3LmVzYWthbC5jb20vYW1wL3V0dGFyLW1haGFyYXNodHJhL25hc2hpay9zaWdodGluZy1vZi1yYXJlLWJvbWJheS1zaGVpbGR0YWlsLWF0LWhhcnN1bC1naGF0LW5hc2hpay1sYXRlc3QtbWFyYXRoaS1uZXdzLXBzbDk4?oc=5