मुंबई बातम्या

High Court: बॉम्बे नव्हे तर ‘महाराष्ट्र उच्च न्यायालय’ नामकरण करा, खासदार गोपाळ शेट्टींचा लोकसभेत प्रस्ताव – Saam TV (साम टीव्ही)

नवी दिल्ली : मुंबई येथील उच्च न्यायालयचे नाव बॉम्बे हायकोर्ट (High Court) ऐवजी महाराष्ट्र राज्य उच्च न्यायालय असे करावे, अशी मागणी उत्तर मुंबई भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी लोकसभा हिवाळी अधिवेशनात केली आहे. १९६० मध्ये महाराष्ट्र सरकारने बॉम्बे हायकोर्टचे नाव महाराष्ट्र उच्च न्यायालय असे करावे, असा निर्णय घेतला होता. पण हे आदेश कधीच लागू झाले नाही.

त्यानंतर वर्ष १९९५ ला बॉम्बे नाव बदलून मुंबई करण्यात आले पण उच्च न्यायालयाचे नाव बॉम्बे हायकोर्टच राहिले.खासदार गोपाळ शेट्टी यांनी मागणी करताना सांगितले आहे की महाराष्ट्रातील नागरिकांना महाराष्ट्र शब्द उपयोग करताना एक विशेष महत्त्व असते. (Latest News)

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMigwFodHRwczovL3d3dy5zYWFtdHYuY29tL211bWJhaS1wdW5lL21haGFyYXNodHJhLWhpZ2gtY291cnQtaW5zdGVhZC1vZi1ib21iYXktaGlnaC1jb3VydC1tcC1nb3BhbC1zaGV0dHlzLXByb3Bvc2FsLWluLWxvay1zYWJoYS1wdnc4ONIBjQFodHRwczovL3d3dy5zYWFtdHYuY29tL2FtcC9zdG9yeS9tdW1iYWktcHVuZS9tYWhhcmFzaHRyYS1oaWdoLWNvdXJ0LWluc3RlYWQtb2YtYm9tYmF5LWhpZ2gtY291cnQtbXAtZ29wYWwtc2hldHR5cy1wcm9wb3NhbC1pbi1sb2stc2FiaGEtcHZ3ODg?oc=5