मुंबई बातम्या

धुक्यात नाही तर प्रदुषणात हरवली मुंबई! वाचा का झाली शहरातील हवा खराब – News18 लोकमत

मुंबई, 05 डिसेंबर : वातावरणात दिवसेंदिवस बदल होत असल्यामुळे हवा गुणवत्ता निर्देशांक खालावत आहे. त्यामुळे गंभीर परिणामांना नागरिकांना सामोरं जावं लागत आहे. मुंबईच्या वातावरणात सकाळच्या वेळी गारवा जाणवत असला तरी मुंबईतील हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता बिघडली असून हवा गुणवत्ता निर्देशांक 250 पार गेल्याचं समोर आलं आहे.

का खालवतोय हवेचा दर्जा?

चक्रीवादळे, अतिवृष्टी, दुष्काळ अशा विविध आपत्तीमुळे भरपूर नुकसान होतंय. आपत्तींची कारणं वेगवेगळी असली तरीही त्याच मुख्य कारण हे वातावरणीय बदलच आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरातील भागामध्ये प्रदूषण वाढले आहे. धूर आणि धुके यांच्या मिश्रणाने तयार झालेले धुरके वातावरणात पसरल्याने हवेचा दर्जा खालावला आहे.

महापरिनिर्वाण दिन : मुंबईकरांनो, घराबाहेर पडण्यापूर्वी वाचा पुढील 3 दिवसांच्या वाहतूकीमधील बदल

मुंबई शहर आणि उपनगरांतील हवेच्या गुणवत्तेचा दर्जा हा सातत्याने बदलत असतो. वाहनामधून निघणारा धूर, काजळी, धूळ यामुळे हिवाळ्यामध्ये मुंबईत सर्वाधिक प्रदूषणाची नोंद होते. तर पावसाळ्यामध्ये सर्वात कमी प्रदूषण नोंदवले जाते. हवा गुणवत्ता निर्देशांक द्वारे हवेची गुणवत्ता तपासली जाते आणि भविष्यातील वायू प्रदूषणाची कल्पना येते. मुंबईतील विविध भागात हवा गुणवत्ता निर्देशांक हा खराब आहे.

किती असायला पाहिजे हवा गुणवत्ता निर्देशांक?

0 ते 50 हवा गुणवत्ता निर्देशांक असेल तर एकदम स्वच्छ हवा असते. 51 ते 100 हवेची शुद्धता समाधानकारक असते. 101 ते 200 हवेची शुद्धता मध्यम 201 ते 300 हवेची शुद्धता म्हणजे प्रदूषण व वाईट हवा तर 301 ते 400 हवेची शुद्धता जास्त वाईट 401 ते 500 हवेची शुद्धता आरोग्यासाठी अतिशय धोकादायक असते.

Mumbai : बुद्धीच्या मशागतीसाठी सलूनमध्ये सुरु केलं ग्रंथालय, पाहा Video

या प्रदूषणाचे शरीरावर काय परिणाम होतात?

हवा प्रदूषणामुळे श्वसनाचे विविध रोग, दमा, क्षयरोग, कर्करोग, सर्दी, खोकला, डोळे, त्वचा, आणि हृदयरोग होण्याची शक्यता असते.

प्रशासनाने याकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे

सूक्ष्म धूलिकण,सल्फर डायऑक्साईड,नायट्रोजन डाय ऑक्साईड,कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साईड यामुळे हवेतील प्रदूषण वाढते आहे. शहरांमध्ये बदल घडवणे आवश्यक आहे आणि तसंच प्रशासनाने याकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. त्यासाठी रस्त्यांचा आणि शहरांचा पुनर्विकास करणे आणि मुंबई महापालिकेसारख्या सरकारी यंत्रणांनीदेखील यास हातभार लावला पाहिजे. आपलं शहर वाचवण्यासाठी आपण पर्यावरण पूरक अश्या गोष्टींचा वापर करायला हवा, असं पर्यावरण प्रेमी आशिष देशमुख यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiWGh0dHBzOi8vbG9rbWF0Lm5ld3MxOC5jb20vbXVtYmFpL2Fpci1xdWFsaXR5LWluZGV4LWhhcy1nb25lLWFib3ZlLTI1MC1tdW1iYWktNzk1NDkzLmh0bWzSAVxodHRwczovL2xva21hdC5uZXdzMTguY29tL2FtcC9tdW1iYWkvYWlyLXF1YWxpdHktaW5kZXgtaGFzLWdvbmUtYWJvdmUtMjUwLW11bWJhaS03OTU0OTMuaHRtbA?oc=5