मुंबई बातम्या

मुंबई विमानतळावर ‘सर्व्हर डाऊन’, प्रवाशांच्या लांबच लांब रांगा – Loksatta

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनस क्रमांक दोनवर सर्व्हर डाऊन झाल्याने सर्व यंत्रणा ठप्प झाल्याचं पाहायला मिळालं. या तांत्रिक बिघाडामुळे विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या. जवळपास ४० मिनिटे हा गोंधळ झाल्यानंतर सर्व यंत्रण पुन्हा सुरू करण्यात प्रशासनाला यश आलं. आता सर्व्हर पुन्हा सुरू झाले असून परिस्थितीत सुधारण होत आहे.

सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यानंतर विमानतळावर प्रवाशांच्या रांगा लागून गर्दी वाढली. त्यानंतर सीआयएसएफने मॅन्युअल पासेस देत परिस्थिती सांभाळली. तसेच या सर्व प्रक्रियेत अधिकचा वेळ लागणार असल्याने प्रवाशांना चेक इन करण्यासाठी आणि आपआपल्या विमानांपर्यंत पोहचण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्यात आला.

हेही वाचा : “…तोपर्यंत भाजपाचा कुठलाही नेता उभ्या महाराष्ट्रात फिरू शकणार नाही”, शिवसेनेचा जाहीर इशारा

सर्व्हर डाऊन झाल्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी विमानतळ प्रशासनाने आपले सर्व कर्मचारी ‘मॅन्युअल प्रोसेस’साठी नेमल्याचीही माहिती दिली. तसेच प्रवाशांनी या परिस्थितीत समजुतदारपणा दाखवल्याबद्दल आभार मानले.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMieGh0dHBzOi8vd3d3Lmxva3NhdHRhLmNvbS9tdW1iYWkvaHVnZS1xdWV1ZS1hdC1tdW1iYWktaW50ZXJuYXRpb25hbC1haXJwb3J0LXRlcm1pbmFsLTItZHVlLXRvLXNlcnZlci1kb3duLXBicy05MS0zMzExMDQxL9IBfWh0dHBzOi8vd3d3Lmxva3NhdHRhLmNvbS9tdW1iYWkvaHVnZS1xdWV1ZS1hdC1tdW1iYWktaW50ZXJuYXRpb25hbC1haXJwb3J0LXRlcm1pbmFsLTItZHVlLXRvLXNlcnZlci1kb3duLXBicy05MS0zMzExMDQxL2xpdGUv?oc=5