मुंबई बातम्या

Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर भीषण अपघात! एक ट्रक कोसळला 100 फूट दरीत – Sakal

मुंबई
sakal_logo

By

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवरील बोरघाटात भीषण अपघात झाला आहे. एक कंटेनर ट्रक 100 फूट खोल दरीत कोसळला आहे. तर दुसऱ्या एका ट्रकच्या केबिनलाही जोरदार फटका बसला आहे. ट्रक आणि केबिन वेगळं झालं आहे. या भीषण अपघातामध्ये 3 ते 4 वाहने एकमेकांना धडकली आहेत. या अपघातानंतर महामार्ग पोलिसांकडून रेस्क्यू ऑपरेशन केलं जात आहे. भीषण अपघातात एक जण ठार झाला आहे. तर एकाला वाचवण्यासाठी बचावकार्य सुरु आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरती पहाटेच्या सुमारास मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावरील ढेकू गावाजवळ तीन वाहनांची एकमेकांना जोरदार धडक बसली. या घटनेनंतर तीनपैकी एक ट्रेलर 100 फूट खोल दरीमध्ये कोसळला. तर दुसऱ्या ट्रकची केबिन या ट्रेलरपाठोपाठ दरीत कोसळली. तर तिसरा ट्रक रस्त्यावरच पलटी झाला आहे.

हे ही वाचा: दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ…

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस, खोपोली पोलीस, देवदूत यंत्रणा अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी घटनीस्थळी दाखल झाली असून बचावकार्य सुरु आहे. या अपघातानंतर क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहनांचं रेस्क्यू करण्यात आलं आहे. तसंच महामार्गावरील वाहतुकीवर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांकडूनही विशेष काळजी घेण्यात येत आहे.

हेही वाचा: Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव, गोरेगावमधील आयटी पार्कच्या मागील जंगलात भीषण आग

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiamh0dHBzOi8vd3d3LmVzYWthbC5jb20vbXVtYmFpL211bWJhaS1wdW5lLWV4cHJlc3N3YXktYWNjaWRlbnQtYS10cmFpbGVyLXBsdW5nZWQtMTAwLWZlZXQtaW50by1yYXZpbmUtYXNrOTfSAQA?oc=5