मुंबई बातम्या

सरकारचा नवा मास्टर प्लॅन, आता लागणार मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील अपघातांना ब्रेक! – News18 लोकमत

मुंबई, 30 नोव्हेंबर :  मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कायमच वाहनांची वर्दळ असते. अनेकदा अपघाताच्या घटना देखील घडतात. वेळत मदत न मिळाल्यानं अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. काही दिवसांपूर्वी याच मार्गावर शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा देखील दुर्दैवीरित्या अपघाती मृत्यू झाला होता. त्यांना वेळेत मदत मिळू न शकल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे आता अशाप्रकारचे अपघात टाळण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवर  24 तास सुरक्षा पथके तैनात करण्यात येणार आहेत. यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होणार असून, एखादा अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळणे शक्य होणार आहे.

 24 तास सुरक्षा पथक 

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता एक्स्प्रेस वेवर  24 तास सुरक्षा पथके तैनात करण्यात येणार आहेत. यासाठी एकूण बारा पथकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. एक डिसेंबरपासून मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर सुरक्षा पथक तैनात केली जाणार आहेत. तसेच काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या देखील वाढवण्यात येणार आहे. रोज होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.  लाईन कटिंग हे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर होणाऱ्या अपघाताच प्रमुख कारण असल्याचं समोर आलं. लाईन कटिंगला आळा बसावा यासाठी देखील उपाययोजना करण्यात येणार आहेत.

हेही वाचा :  गद्दारांची तुलना शिवरायांशी हा तर महाराष्ट्राला…; आदित्य ठाकरे संतापले

अपघातग्रस्तांना वेळेत मदत मिळणार 

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाढत असलेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता एक्स्प्रेस वेवर पथकांची नियुक्ती केली जाणार आहे. ही पथके या ठिकाणी 24 तास उपलब्ध असणार आहेत. यामुळे अपघातांना आळा तर बसेलच पंरतु जर एखादा अपघात झाला, तर अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळणे शक्य होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiiAFodHRwczovL2xva21hdC5uZXdzMTguY29tL21haGFyYXNodHJhL3B1bmUvYXBwb2ludG1lbnQtb2Ytc2VjdXJpdHktdGVhbXMtdG8tcHJldmVudC1hY2NpZGVudHMtb24tbXVtYmFpLXB1bmUtZXhwcmVzc3dheS1taGRhLTc5MzM0MC5odG1s0gEA?oc=5