मुंबई बातम्या

मुंबई: विभागीय पासपोर्ट कार्यालय शनिवारी सुरू राहणार – Loksatta

मुंबई: मुंबई विभागीय पासपोर्ट कार्यालय (आरपीओ) येत्या शनिवारी, ३ डिसेंबर रोजी खुले राहणार असून त्या दिवशी वेळ निश्चित करण्यासाठी बुधवारपासून (३० नोव्हेंबर) अर्ज करता येईल. आरपीओ मुंबईची सर्व कार्यालये पासपोर्ट अर्जांच्या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शनिवार, ०३ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ५.३० या वेळेत खुली ठेवण्यात येणार आहेत. या दिवसासाठी नव्याने भेटीची वेळ निश्चित करता येईल. यापूर्वी भेटीची वेळ मिळालेली असताना त्यावेळी उपस्थित राहू न शकलेले नागरिकही शनिवारी वेळ निश्चित करू शकतील. तसेच ३ डिसेंबरनंतर ज्यांना कार्यलय भेटीची वेळ मिळाली आहे. त्यांनाही शनिवारी वेळ निश्चित करता येईल. मात्र, नियोजित वेळ बदलून घेण्याची ही एकच संधी नागरिकांना मिळेल.

हेही वाचा >>> मुंबई: बदलेल्या राजकारणामुळे अटक; संजय राऊत यांचा उच्च न्यायालयात दावा

नागरिकांनी दिलेल्या संकेतस्थळावर अर्ज करून शुल्क भरावे. अर्ज भरून झाल्यानंतर अर्जदाराने भरलेल्या रकमेची पडताळणी करण्यासाठी खालील दिलेल्या संकेस्थळावर पुन्हा लॉग इन करावे आणि भेटीची वेळ निश्चित करावी. नागरिकांना लवकरात लवकर पासपोर्ट अपॉइंटमेंट उपलब्ध करून देण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने हा उपक्रम राबविला आहे.

अधिकृत संकेतस्थळ – https://www.passportindia.gov.in/

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiemh0dHBzOi8vd3d3Lmxva3NhdHRhLmNvbS9tdW1iYWkvdGhlLWRpdmlzaW9uYWwtcGFzc3BvcnQtb2ZmaWNlLXdpbGwtY29udGludWUtb24tc2F0dXJkYXktbXVtYmFpLXByaW50LW5ld3MteXNoLTk1LTMzMDc0NTgv0gEA?oc=5