मुंबई बातम्या

Mumbai : दहा महिन्यात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर 168 अपघात – Sakal

मुंबई
sakal_logo

By

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गांवरील अपघातांची संख्येत फार घट दिसून येत नाही. नियमांच्या काटेकोर अंमबलजावणीनंतरही बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांची संख्या द्रुतगती महामार्गावर आहे. त्यामूळे अपघात नगण्य टक्केने कमी झाल्याचा दावा दहा महिन्याच्या आकडेवारीवरून महामार्ग पोलीस करत असल्याचे दिसून येत आहे. त्यानंतरही जानेवारी ते आॅक्टोंबर या दहा महिन्यात 168 अपघात झाले असून, 68 लोकांचा अपघाती बळी गेला आहे.

द्रुतगती महामार्ग वळणदार आणि चढत्या उतरत्या स्वरूपाचा आहे. त्याशिवाय अवजड वाहनांची नियमीत रांगा असल्याने खासगी वाहनांना वाहतुकीसाठी प्रचंड अडचणीचा सामना करावा लागतो आहे. यामध्ये अवजड वाहनांच्या लेनकटिंगमूळे अपघात होत असून, इतरही वाहतुक नियमांचे सर्रास उल्लघंन होत आहे. महामार्ग पोलीसांकडून वेळोवेळी अशा वाहनांवर कारवाई करूनही अपघातांची संख्येत अपेक्षीत घट होत नसल्याचे दिसून येत आहे.

महामार्ग पोलीसांच्या अपघातांच्या आकडेवारीवरून गेल्यार्षीच्या तुलनेत यावर्षी दहा महिन्यात एकूण अपघाताच्या फक्त एक टक्के अपघात घट दाखवण्यात आली आहे. तर जिवघेण्या अपघातांमध्ये 7 टक्याने घट झाल्याचे सांगितले आहे. गेल्यावर्षी जानेवारी ते आॅक्टोंबर या महिन्यात 169 एकूण अपघात झाले होते. त्यापैकी 60 जिवघेण्या अपघातामध्य़े 74 लोकांना जिव गमवावा लागला होता. त्याशिवाय 44 गंभीर अपघातांमध्ये 96 लोकांना गंभीर दुखापती झाल्या होत्या. यातुलनेत यावर्षी 168 एकूण अपघात झाले असून, 56 जिवघेण्या अपघातांमध्ये 68 लोकांचा मृत्यु झाला आहे. तर 42 गंभीर अपघातामध्ये 92 लोकांना गंभीर दुखापती झाल्याची महामार्ग पोलीसांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiXWh0dHBzOi8vd3d3LmVzYWthbC5jb20vbXVtYmFpL211bWJhaS1tdW1iYWktcHVuZS1leHByZXNzd2F5LWluLXRlbi1tb250aHMtMTY4LWFjY2lkZW50cy1yc245M9IBAA?oc=5