मुंबई बातम्या

Mumbai : मुंबई विमानतळावर डीआरआयकडून 2 परदेशी नागरिकांना अटक 50 कोटी रुपयांचे 8किलो हेरॉईन जप्त – Sakal

मुंबई
sakal_logo

By

मुंबई : महसूल गुप्तचर संचालनालयाने म्हणजेच डीआरआईने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन परदेशी नागरिकांना 50 कोटींच्या ड्रग्जसह अटक केली आहे. या दोघांकडून डीआरआयने 8 किलो हेरॉईन जप्त केले असून, आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रग्जची किंमत 50 कोटींच्या आसपास आहे.

दोन प्रवासी ड्रग्जच्या तस्करीसाठी मुंबई शहरात येणार असल्याची गुप्त माहिती डीआरआयला मिळाली होती. त्यानंतर डीआरआय अधिकाऱ्यांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. आरोपीची कसून चौकशी केली असता त्यांनी ड्रग्ज असल्याची कबुली दिली.

दोन्ही आरोपींनी प्रथम तपास यंत्रणेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या सामानाची झडती घेतली असता त्यांच्याजवळ प्रत्येकी चार किलो वजनाची दोन पाकिटे सापडली. या पाकिटामध्ये पांढरी पावडर होती, त्या पावडरची तपासणी केली असता ते उच्च दर्जाचे हेरॉईन अमली पदार्थ होता. डीआरआयने दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले. तेथून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. हे दोन्ही ड्रग्ज तस्कर कोणत्या स्मगलिंग सिंडिकेटशी संबंधित होते याचा तपास डीआरआयचे अधिकारीही करत आहेत.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMihgFodHRwczovL3d3dy5lc2FrYWwuY29tL211bWJhaS9tdW1iYWktY3JpbWUtZHJpLWFycmVzdHMtMi1mb3JlaWduLW5hdGlvbmFscy1hdC1tdW1iYWktYWlycG9ydC1zZWl6ZXMtOC1rZy1oZXJvaW4td29ydGgtcnMtNTAtY3JvcmUtcmowMdIBigFodHRwczovL3d3dy5lc2FrYWwuY29tL2FtcC9tdW1iYWkvbXVtYmFpLWNyaW1lLWRyaS1hcnJlc3RzLTItZm9yZWlnbi1uYXRpb25hbHMtYXQtbXVtYmFpLWFpcnBvcnQtc2VpemVzLTgta2ctaGVyb2luLXdvcnRoLXJzLTUwLWNyb3JlLXJqMDE?oc=5