मुंबई बातम्या

‘बॉम्बे एअरपोर्टपर आपका स्वागत है’ नाशिकच्या प्रवाशाची इंडिगो एअरलाईन्सविरोधात – ABP Majha

Nashik News : एकीकडे राज्यात महाराष्ट्र (Maharashtra) विरुद्ध कर्नाटक (Karnataka) असा वाद सुरू असताना नाशिकच्या प्रवाशाने इंडिगो एअर लाईन्सच्या (IndiGo Airlines) एअर हॉस्टेसच्या हिंदी घोषणेमुळे तक्रार केली आहे. या घटनेचा व्हिडीओ प्रवाशांने सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट केला असून याबाबत कंपनीला रीतसर मेलही करण्यात आला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून मराठीचा मुद्दा गाजत असून सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात वाद सुरू झाल्याने अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. अशातच नाशिक (Nashik Latest News) येथील वकिली व्यवसाय करणाऱ्या शिवाजी सहाणे यांनी विमान प्रवासात मराठीचा मुद्दा उचलून धरून इंडिगो एअर लाईन्स कंपनीला धारेवर धरले आहे. सहाणे यांनी तक्रारीचा रीतसर मेल केला असून मेलचा प्रतिसाद न आल्यास कोर्टात जाण्याचा इशारा देखील दिला आहे. 

नाशिकचे रहिवासी असलेले वकील शिवाजी सहाणे हे काल बागडोगरा एअरपोर्ट ते मुंबई एअरपोर्ट असा प्रवास करत असताना इंडिगोची सिक्स इ 5275 या क्रमांकाची फ्लाईट होती. मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर एअर होस्टेस ने अनाऊन्समेंट सुरू केली, ‘बॉम्बे एअरपोर्ट पे आपका स्वागत है’ अशी अनाउन्समेंट केली. त्यावेळी खाली उतरत असताना मी त्या हॉटेलला विचारलं ‘आपने बॉम्बे एअरपोर्ट पे स्वागत’ हे अशी का अनाऊन्समेंट केली. तुम्ही ‘छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई विमानतळावर आपले स्वागत आहे’ अशी अनाऊन्समेंट का नाही केली. 

पाहा व्हिडीओ : Nashik : Indigo Airlines च्या एअर हॉस्टेस विरोधात प्रवाशाची तक्रार ABP Majha

News Reels

[embedded content]

सहाणे यांच्या या प्रश्नावर एअर हॉस्टेसने उत्तर दिलं की, ‘आम्हाला अशाच पद्धतीने बोलण्याचे प्रशिक्षण, सर्वांना विमानसेवेत अशाच पद्धतीने अनाऊन्समेंट आणि इतर सूचना देण्याविषयी सांगण्यात आले आहे. त्यानुसार आम्ही सेवा देत असल्याचे एअर होस्टेसने सांगितले. त्यानुसार आम्ही ‘बॉम्बे एअरपोर्ट बोलणार, ‘छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ, नाही बोलणार असेही एअर होस्टेसने यांनी स्पष्ट केले. यावर सहाणे यांनी याबाबतच्या सूचना असतील, तर त्या दाखवा,  मात्र एअर होस्टेसने सूचना दाखविण्यास नकार दिल्याचे सहाणे यांनी व्हिडिओत म्हटले आहे. त्यामुळे सहाणे ग्राहक केंद्रात संपर्क साधत या घटनेविषयी रीतसर मेल केला आहे. मेलमध्ये अस म्हटले आहे की, जर समजा तुम्ही यावर दखल घेऊन संबंधित कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केला नाही आणि मुंबई छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट अशी घोषणा केली नाही. तर नाईलाजाने याविरुद्ध कोर्टामध्ये दाद मागावी लागेल. आता त्यांच्या प्रतिसादाची वाट बघत असून नाहीतर कोर्टामध्ये जाण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय राहणार नसल्याचे सहाणे व्हिडिओच्या शेवटी सांगतात. 

नेमकं काय घडलं विमानात?

प्रवासी शिवाजी सहाणे यांनी बागडोगरा ते मुंबई असा प्रवास केला. यावेळी एअर होस्टेसने छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाचे नाव न घेता “बॉम्बे एअर पोर्टवर” स्वागत आहे, असा केला उल्लेख केल्यानं विमानातच विचारला जाब विचारला. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने तक्रार केली. मुबंई विमानतळावर लँडिंग आणि टेकऑफच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असा उल्लेख केला नाही, तर न्यालायात जाण्याचा इशारा दिला आहे.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMinAFodHRwczovL21hcmF0aGkuYWJwbGl2ZS5jb20vbmV3cy9uYXNpay9uYXNoaWstcGFzc2VuZ2VyLWNvbXBsYWludC1hZ2FpbnN0LWluZGlnby1haXJsaW5lcy1hYm91dC1tYXJhdGhpLWFubm91bmNlbWVudC1tYWhhcmFzaHRyYS1tdW1iYWktbWFyYXRoaS1uZXdzLTExMjQ4NDfSAQA?oc=5