मुंबई बातम्या

Mumbai News: मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त – Zee २४ तास

प्रशांत अंकूशराव, झी मीडिया, मुंबई: मुंबई पोलिसांची (Mumbai Police) अवैध ई सिगारेट वर धडक कारवाई 58 लाख 50 हजार रुपयांचे सिगारेट जप्त करण्यात आला आहे. मुंबई शहरात विक्रीसाठी आणलेल्या इलेक्ट्रॉनिक सिगारेटची विक्री व साठा करणाऱ्या इसमावर मुंबई पोलिसांच्या सी.बी. कंट्रोल, आर्थिक गुन्हे विभागाने छापा कारवाईत करत रू. 58 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या 5500 ई-सिगारेट (e-cigarettes) जप्त केल्या असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ई-सिगारेटच्या वापरामुळे आरोग्यावर होणारे घातक परिणाम लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (health ministry) ई-सिगारेटवर विक्री आयात आणि उत्पादन (product) यावर बंदी घातली आहे. मुंबईमधील सातरस्ता, आग्रीपाडा परिसरात एका इसमाकडून मोठया प्रमाणात ई-सिगारेटचा माल विक्रीसाठी मागविण्यात आला असल्याची खात्रीलायक माहिती गोपनीय बातमीदारांकडून सी.बी. कंट्रोल कक्षास प्राप्त झाली होती. 

नक्की काय प्रकार घडला? 

प्राप्त माहितीच्या अनुषंगाने 19 नोव्हेंबर रोजी आर्थिक गुन्हे विभागाच्या सी. बी. कंट्रोल कक्षाच्या पोलीस पथकाने सापळा रचून बापूराव जगताप मार्ग, सातस्ता, आग्रीपाडा, मुंबई येथे ई-सिगारेटचा साठा डिलीव्हरी करण्याकरीता आलेल्या मोटार टेम्पोची झडती घेतली असता सदर टेम्पोमध्ये एकूण 3100 नग इलेक्ट्रॉनिक सिगारेट किंमत रु. 34,50,000/- चा मुद्देमाल मिळून आला. सदर साठा बाळगणाऱ्या एका इसमास ताब्यात घेवून ई-सिगारेटसचा बंदी (उत्पादन, जायत, निर्यात, जाहिरात) अध्यादेश, 2019 व तंबाखुजन्य उत्पादने (जाहिरात प्रतिबंध, व्यापार, वाणिज्य, उत्पादन, साठा, वितरण व विक्री याचे नियमन) कायदा, 2003 अन्वये गुन्हा नोंद केला. डिलीव्हरी करण्यासाठी आलेल्या इसमाकडे कसून तपास केला असता त्याच्याकडे आणखी रु. 24,00,000/- किमतीचा एकूण 2400 नग इलेक्ट्रॉनिक सिगारेटचा साठा मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला असून सी. बी. कंट्रोल कक्षाकडून सदर कारवाईमध्ये आतापर्यंत रू. 58,50,000/- किंमतीचा एकुण 5500 नग इलेक्ट्रॉनिक सिगारेटचा साठा जप्त केला. 

हेही वाचा – पत्नीकडे पाहू नको बोलल्याचा राग मनात धरत तो थेट घरात शिरला अन्… थराराक घटना

कशी झाली कारवाई? 

या साठयात आणखीही वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आर्थिक गुन्हे विभागाच्या सी.बी.कंट्रोल कक्षाकडून जुलै महिन्यापासून मुंबईमध्ये अद्यापर्यंत 19 ठिकाणी ई सिगारेट विक्री करणाऱ्या इसमांविरोधात कारवाई करून एकूण 19 आरोपितांविरुद्ध गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. ई सिगारेट वापरण्यास व बाळगण्यास सोयीस्कर असून दिसण्यामध्ये एखाद्या पेनड्राईव्ह किंवा इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट प्रमाणे दिसते. सध्या सिगारेट प्रेमी, तरुण-तरुणी आणि महाविद्यालयीन मुलांमध्ये ई-सिगारेट ओढण्याकडे कल प्रचंडप्रमाणे वाढत आहे. त्यामुळे तरुणवर्ग ई-सिगारेटच्या आहारी जात असल्याने व त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेऊन पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई पोलीस सह आयुक्त, आर्थिक गुन्हे व पोलीस उप आयुक्त, आर्थिक गुन्हे-2 यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे विभागाच्या सी.बी. कंट्रोल कक्षाकडून जुलै महिन्यापासून मुंबईमधील ई-सिगारेट उत्पादनांची विक्री करणाऱ्या दुकानदार व इसमांवर सातत्याने कारवाई करण्यात येत आहे.

हेही वाचा – Inspirational Story: गडचिरोलीच्या सुपुत्राची अभिमानास्पद कामगिरी, डॉ. भास्कर हलामी यांची अमेरिकेत वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून नियुक्ती

सदर केसची कामगिरी पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई श्री. विवेक फणसळकर, पोलीस सह आयुक्त, आर्थिक, गुन्हे श्री. प्रविण पडवळ, पोलीस उप आयुक्त, आर्थिक गुन्हे-2 श्री. महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली सी.बी. कंट्रोलचे प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन पाटील, स.पो.नि. रूपेश दरेकर, संतोष व्यागेहळ्ळी, पो.ह. महेश नाईक, गणेश डोईफोडे, महेंद्र जाधव, चंद्रकांत वलेकर, महेंद्र दरेकर, संतोष पवार, पोलीस नाईक शेखर भंडारी, किशोर मोरे, विशाल यादव पोलीस अंमलदार नितीन मगर, भरत खारखी व महिला पोलीस अंमलदार हिना राऊत, संगिता गिरी सी. बी. कंट्रोल, आ.गु.वि., मुंबई या कक्षाकडून करण्यात आली. 

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMif2h0dHBzOi8vemVlbmV3cy5pbmRpYS5jb20vbWFyYXRoaS9tYWhhcmFzaHRyYS9tdW1iYWktcG9saWNlLXJhaWQtb24taWxsZWdhbC1lLWNpZ2FyZXR0ZXMtd29ydGgtcnMtNTgtbGFraC01MC10aG91c2FuZC1naC82NzAwMzfSAQA?oc=5