मुंबई बातम्या

मुंबई विमानतळाच्या आसपासच्या रस्त्यांची तातडीची दुरुस्ती; महिन्याभरात काम पूर्ण करणार – Loksatta

मुंबई महानगरपालिकेने छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाच्या आसपासच्या रस्त्याचे तातडीने सपाटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. हे काम डिसेंबरमध्ये सुरू करण्यात येणार असून ते महिन्याभरात पूर्ण करण्यात येणार आहे. या कामासाठी नऊ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

हेही वाचा- ८४ झाडे कापण्याची परवानगी मिळणार का? आरे कारशेड प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी

मुंबई सुभोभिकरण प्रकल्पांतर्गत महत्त्वाच्या रस्त्यांचे पुनःपुष्टीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत महानगरपालिकेच्या एच पूर्व विभागाने मुंबई विमानतळाच्या आसपासच्या रस्त्यांची सुधारणा करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाच्या प्रवेशद्वार क्रमांक ८ पासून हंसभुर्गा मार्गाद्वारे पश्चिम द्रुतगती महामार्गापर्यंतच्या रस्त्याचे पुनःपृष्टीकरण करण्यात येणार आहे. हे काम तातडीने हाती घेण्यात येणार असून नोव्हेंबरच्या अखेरीस निविदा उघडण्यात येणार आहेत. डिसेंबरमध्ये कामाला सुरुवात होणार आहे.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMibmh0dHBzOi8vd3d3Lmxva3NhdHRhLmNvbS9tdW1iYWkvdXJnZW50LXJlcGFpci1vZi1yb2Fkcy1hcm91bmQtbXVtYmFpLWFpcnBvcnQtbXVtYmFpLXByaW50LW5ld3MtZHBqLTkxLTMyOTIwMjcv0gEA?oc=5