मुंबई बातम्या

शिवाली हे खरं आहे का? समीर चौघुलेच्या डायलॉगवर मुंबई पोलिसांनी साधला निशाणा – News18 लोकमत

मुंबई, 22 नोव्हेंबर : संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारा प्रसिद्ध कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत महाराष्ट्राची हास्यजत्रा पाहिली जाते. लोक तासंतास टिव्हीवर हास्यजत्रा पाहत बसतात. तेच तेच एपिसोड पुन्ह पाहातानाही प्रेक्षक तितकेच हसतात. कार्यक्रमातील कामाल कलाकार आणि अँकर प्राजक्ता माळी हे शोचे स्टार्स आहेतच. मात्र त्याहून जास्त कशाची चर्चा असेल तर हास्यजत्रेतील कलाकारांच्या तोंडी असलेले त्यांचे फेसम डयलॉग्स. अगदी प्राजक्ताचं ‘व्वा दादा व्वा’ असो किंवा गौरव मोरेचं ‘आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा असो’. इतकाच काय तर ‘शिवाली हे खरं आहे का?’  समीर चौघुलेचा डायलॉग तर घरात घरात प्रसिद्ध झाला आहे. अनेक जण आपल्या जवळच्या माणसाला सर्रासपणे हा डायलॉग बोलताना पाहतात. प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या समीर चौघुलेच्या याच वाक्यावर थेट मुंबई पोलिसांनी निशाणा साधला आहे.

समीर चौघुलेच्या प्रत्येक स्किटमध्ये शिवाली हे खरं आहे हा डायलॉग असतोच. त्यानं तो डायलॉग नाही घेतला तर प्रेक्षकांनाही चैन पडत नाही. प्रेक्षकांसारखीच मुंबई पोलिसांनाही या डायलॉगची भुरळ पडली आहे. मुंबई पोलिसांच्या ऑफिशिअल सोशल मीडियावर समीर चौघुलेचा हा डायलॉग वापरून भन्नाट मीम तयार करण्यात आलाय. मुंबई सायबर पोलीस सातत्यानं लोकांनापर्यंत सोशल मीडियाबाबत जनजागृती करताना दिसतात. यावेळी त्यांनी थेट लोकांचाच आवडता डायलॉग घेऊन त्यांच्यापर्यंत महत्त्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा – ‘बगळ्याने मोराचे अनुकरण करू नये…’ हास्यजत्रेच्या दिग्दर्शकांचा निशाणा नक्की कोणाकडे?

महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या एका स्किटमधील समीर चौघुले आणि शिवाली परबचा एका फोटो शेअर करण्यात आलाय. त्यावर ‘माझा संकेतशब्द ( पासवर्ड) माझी जन्मतारीख आहेट असं लिहिण्यात आलं आहे. त्यावर समीर चौघुलेचा टशिवाली हे खरं आहे का?ट हा फेमस डायलॉग लिहिण्यात आला आहे. मीमच्या कॅप्शनमध्ये मुंबई पोलिसांनी म्हटलंय, ‘हा शुद्ध बालिशपणा आहे शिवाली! असा बालिशपणा तुम्ही करू नका आणि आपला संकेतशब्द अक्षरे, अंक व विशेष चिन्ह वापरून तयार करा!’.

सोशल मीडियाच्या जगात सायबर क्राइमचे गुन्हे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत.  सायबर सेफ्टी ही सध्या काळाची गरज झाली आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून सातत्यानं काहीतरी क्रिएटिव्ह पद्धतीनं याबद्दलची जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जातो. मुंबई पोलिसांच्या या प्रयोगाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असतो. याआधीही मुंबई पोलिसांनी अनेक सिनेमा आणि मालिकांच्या फेमस डायलॉग किंवा व्यक्तिरेखा घेऊन अशा प्रकारे जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiowFodHRwczovL2xva21hdC5uZXdzMTguY29tL2VudGVydGFpbm1lbnQvbXVtYmFpLXBvbGljZS1jcmVhdGUtbWVtZXMtb24tbWFoYXJhc2h0cmFjaGktaGFzeWFqYXRyYS1zYW1pci1jaG91Z2h1bGUtZmFtb3VzLXNoaXZhbGktaGUta2hhcmF5LWthLWRpYWxvZy1taGdtLTc4OTgwMi5odG1s0gGnAWh0dHBzOi8vbG9rbWF0Lm5ld3MxOC5jb20vYW1wL2VudGVydGFpbm1lbnQvbXVtYmFpLXBvbGljZS1jcmVhdGUtbWVtZXMtb24tbWFoYXJhc2h0cmFjaGktaGFzeWFqYXRyYS1zYW1pci1jaG91Z2h1bGUtZmFtb3VzLXNoaXZhbGktaGUta2hhcmF5LWthLWRpYWxvZy1taGdtLTc4OTgwMi5odG1s?oc=5