मुंबई बातम्या

मुंबईत मिळतं तब्बल 1 लाखाचं पान आणि सोबत भरपूर गिफ्ट्स! पाहा Video – News18 लोकमत

मुंबई, 23 नोव्हेंबर : जेवण झाल्यानंतर मुखशुद्धी अनेकांना पान खायला आवडतं. काही जणांना पान खाण्याचं व्यसनही असतं. पानशौकिनांचा मोठा इतिहास आणि परंपरा आपल्याकडं आहे. या मंडळीची आवड पुरवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पान बाजारात मिळतात. चॉकलेट पान, फायर पान, आईस पान, स्मोक पान असे अनेक प्रकारचे पान बाजारात मिळतात. पण तुम्हाला एक लाख रुपये किंमत असलेल्या पानाबद्दल माहिती आहे का? होय, मुंबईत चक्क एक लाख रुपयांचं  पान मिळतं. हे पान कुठे मिळतं? हे इतकं महाग का? याची खासियत काय ? या तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आम्ही देणार आहोत.

द पान स्टोरी!

मुंबईतील माहीमध्ये ‘ द पान स्टोरी ‘ या दुकानात हे पान मिळतं.  नावाप्रमाणेच या दुकानाची सुद्धा एक खास गोष्ट आहे. या दुकानाच्या मालकाचे नावं नौशाद शेख आहे. नौशाद यांनी एमबीएपर्यंत शिक्षण घेतलंय. त्यांनी आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्येही अनेक वर्ष काम केलं. त्यामध्ये त्यांना चांगला पगार मिळत होता.  मात्र, स्वतः चा वडिलोपार्जित व्यवसाय त्यांना एका वेगळ्या उंचीवर घेऊन जायचा होता. गादीवरच्या पानाला एक रॉयल लूक देण्याचं स्वप्न होतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली. त्यानंतर ‘ द पान स्टोरी’चा जन्म झाला. नौशाद याच दुकानात एक लाखा रुपये किमतीचं पान विकतात.

आपल्या आजवरच्या प्रवासाबद्दल बोलताना नौशाद म्हणाले की, ‘वडीलांपासून आमची पानाची गादी सुरू होती. मी सुद्धा याचं पानाच्या गादीवर बसत होतो. मी कॉलेजमध्ये एक प्रोजेक्ट केला होता. त्यामध्ये पानाचंही रॉयस दुकान असू शकतं हे दाखवलं होतं. कॉलेज संपल्यानंतर तो विषय मागे पडला, पण मला माझं ते प्रोजेक्ट, माझं स्वप्न पूर्ण करायचं होतं.

Mumbai :  ‘या’ पानवाल्याकडं आहे 250 देशांमधील घंटांचा संग्रह, पाहा Video

माझं हे स्वप्न समजल्यानंतर घरच्यांनी वेड्यात काढलं. पण, बायकोनं खंबीर पाठिंबा दिला. या पाठिंब्यामुळे मी तंबाखू विरहित दुकान सुरू केलं. अनेक जण पान खाऊन रस्त्यात कुठंही थुंकतात. या लोकांमुळे परिसर अस्वच्छ होतो. पानाची प्रतिमा डागाळते. हे प्रकार टाळण्यासाठीच आमच्या दुकानात कोणतेही तंबाखूजन्य पदार्थ विकले जात नाहीत,’ असं नौशाद सांगतात.

असं आहे एक लाखाचं पान

‘द पान स्टोरी’ या दुकानात मिळणाऱ्या एक लाखाच्या पानाला ‘ फ्रेग्रेंस ऑफ लव्ह ‘ असं नावं देण्यात आलं आहे. या पॅकेज मध्ये राजा राणी अशी दोन पान असतात. सोबत दोन सुगंधी अत्तर, पानावर सोन्याचा वर्क असतो.  त्याचबरोबर या पानाची खास  आठवण म्हणून संगमरवरी दगडापासून तयार केलेला ताजमहालची प्रतिकृतीही भेट देण्यात येते.  या प्रतिकृतीमध्ये पाच प्रकारचे सुगंधी अत्तर असतात.

एक लाखांच्या पानासह नौशाद यांच्या दुकानात जवळपास  350 प्रकारचे पान मिळतात. या दुकानात 50 रुपयांपासून ते 1 लाख रूपयापर्यंतचं पान उपलब्ध आहे. लहान मुलांसाठी चॉकलेट पान, तरुणांसाठी स्मॉक पान, अशी वयोगटानुसार पानांचे वर्गीकरण इथं पाहायला मिळते.

मुंबईचा प्रसिद्ध वेफर्स पाव! वडापावलाही देतोय टक्कर, पाहा Video

image

गुगल मॅपवरून साभार

कुठं खाणार?

‘द पान स्टोरी’

4/30 टेरेस बिल्डिंग, लेडी जमशेदजी मार्ग,  दिल्ली झायकाच्या जवळ, सेंट मायकल चर्चच्या समोर माहीम, पश्चिम पिन कोड – 400016

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMikwFodHRwczovL2xva21hdC5uZXdzMTguY29tL21haGFyYXNodHJhL211bWJhaS90aGUtcGFhbi1zdG9yeS0xLWxha2gtcnVwZWVzLXBhYW4tYW5kLXdpdGgtbWFueS1naWZ0cy1rbm93LW1vcmUtYWJvdXQtaXRzLXNwZWNpYWx0eS1tdW1iYWktNzg5OTkxLmh0bWzSAZcBaHR0cHM6Ly9sb2ttYXQubmV3czE4LmNvbS9hbXAvbWFoYXJhc2h0cmEvbXVtYmFpL3RoZS1wYWFuLXN0b3J5LTEtbGFraC1ydXBlZXMtcGFhbi1hbmQtd2l0aC1tYW55LWdpZnRzLWtub3ctbW9yZS1hYm91dC1pdHMtc3BlY2lhbHR5LW11bWJhaS03ODk5OTEuaHRtbA?oc=5