मुंबई बातम्या

मुंबई सेंट्रल आरटीओत जागतिक स्मरण दिन साजरा – Sakal

मुंबई सेंट्रल आरटीओत जागतिक स्मरण दिन साजरा

मुंबई
sakal_logo

By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या अथवा गंभीर जखमी झालेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ जागतिक स्मरण दिन उपक्रम मुंबई मध्यच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात साजरा करण्यात आला. या वेळी रस्ते अपघातातील मृत व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार आणि वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशचे अध्यक्ष नितीन डोसा उपस्थित होते.
विवेक भीमनवार आपल्या मार्गदर्शनपर भाषणात नमूद केले की, रस्ता अपघातांचे प्रमुख कारण म्हणजे वाहनचालकांचे कौशल्याची कमतरता नसून त्यांच्यातील बेशिस्ती कारणीभूत आहे. भारतात वाहनचालकांना शिस्त लावण्याकरिता प्रशासकीय आणि अंमलबजावणी यंत्रणामध्ये सुधारणेला वाव आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मोटार वाहन विभाग, महामार्ग पोलिस, एमएसडीसी आणि आयआरबी या माध्यमातून पुढील सहा महिने विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiXmh0dHBzOi8vd3d3LmVzYWthbC5jb20vbXVtYmFpL3RvZGF5cy1sYXRlc3QtbWFyYXRoaS1uZXdzLW11bTIyaDA1NjE1LXR4dC1tdW1iYWktMjAyMjExMjAwMjQ3MTTSAWJodHRwczovL3d3dy5lc2FrYWwuY29tL2FtcC9tdW1iYWkvdG9kYXlzLWxhdGVzdC1tYXJhdGhpLW5ld3MtbXVtMjJoMDU2MTUtdHh0LW11bWJhaS0yMDIyMTEyMDAyNDcxNA?oc=5