मुंबई बातम्या

मुंबई : धक्कदायक! समुद्रात पाच जण बुडाले, स्थानिकांच्या सतर्कतेने 3 मुलांचे वाचले प्राण – News18 लोकमत

मुंबई : वरळी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाच मुलं समुद्रात बुडाल्याची घटना वरळीमध्ये घडली आहे. मुलं बुडत असल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यातील पाचही मुलांना बाहेर काढून त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र यातील दोन जणांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. कार्तिक चौधरी वय आठ वर्ष आणि सविता पाल वय 12 वर्ष अंस मृत्यू झालेल्या मुलांची नाव आहेत.

दोघांचा मृत्यू

घटनेबाबत अधिक माहिती अशी की वरळी परिसरात पाच मुलं बुडत असल्याचं स्थानिकांच्या लक्षात आलं. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत या मुलांना समुद्रातून बाहेर काढलं. त्यांना तातडीने खासगी वाहनातून हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र यातील पाच पैकी दोन मुलांचा मृत्यू झाला आहे तर तीन जणांवर उपचार सुरू आहेत. कार्तिक चौधरी वय आठ वर्ष आणि सविता पाल वय 12 वर्ष असं मृत्यू झालेल्या मुलांची नाव आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiYGh0dHBzOi8vbG9rbWF0Lm5ld3MxOC5jb20vbWFoYXJhc2h0cmEvZml2ZS1wZW9wbGUtZHJvd25lZC1pbi1tdW1iYWktc2VhLXR3by1kaWUtbWhkYS03ODgwNjAuaHRtbNIBAA?oc=5