मुंबई बातम्या

मुंबई: मध्य रेल्वेवरील जलद लोकलचा वेग मंदावला ; प्रवाशांची धीम्या लोकलकडे धाव – Loksatta

सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकल सकाळी ११.३० वाजल्यापासून विलंबाने धावत आहेत. तशी उद्घोषणा घाटकोपर, कुर्ला, ठाणे, कल्याण, डोंबिवली आदी स्थानकांत करण्यात येत असून त्यामागील नेमके कारण मात्र मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले नाही.

हेही वाचा >>>मुंबई: बनावट कागदपत्रांद्वारे ‘महारेरा’कडे नोंदणी करणाऱ्या ४९ विकासकांना दणका

मध्य रेल्वेवरील जलद मार्गावरील लोकल विलंबाने धावू लागल्यामुळे अनेक प्रवासी धीम्या लोकल गाड्यांकडे वळत असून या लोकल गाड्यांमध्ये प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागत आहे. सीएसएमटी आणि कल्याण, डोंबिवली दिशेने जाणाऱ्या धीम्या लोकलही विलंबाने धावत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून मध्य रेल्वेवरील लोकल सेवा विविध कारणांमुळे विस्कळीत होत आहे. सिग्नल यंत्रणा, ओव्हरहेड वायर, लोकलमधील बिघाड, त्याचबरोबर लोकल, मेल-एक्स्प्रेस गाड्यांमधील आपत्कालीन साखळी विनाकारण खेचण्याच्या प्रकारांमुळे वेळापत्रकावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMifGh0dHBzOi8vd3d3Lmxva3NhdHRhLmNvbS9tdW1iYWkvdGhlLXNwZWVkLW9mLWZhc3QtbG9jYWwtb24tY2VudHJhbC1yYWlsd2F5LWhhcy1zbG93ZWQtZG93bi1tdW1iYWktcHJpbnQtbmV3cy1hbXktOTUtMzI0OTk5NS_SAQA?oc=5