मुंबई बातम्या

मुंबईत 12 डिसेंबर पर्यंत ड्रोनबंदी; मुंबई पोलिसांचे आदेश जारी – Sakal

गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार संभाव्य दहशतवादी कारवायांचा धोका लक्षात घेता मुंबई पोलिसांनी शहरात ड्रोन बंदीचे आदेश पोलीस आयुक्त मुख्यालयातून जारी करण्यात आले आहेत.

मुंबई
sakal_logo

By

मुंबई – गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार संभाव्य दहशतवादी कारवायांचा धोका लक्षात घेता मुंबई पोलिसांनी शहरात ड्रोन बंदीचे आदेश पोलीस आयुक्त मुख्यालयातून जारी करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आदेशात 12 डिसेंबरपर्यंत ड्रोन, रिमोट कंट्रोल, मायक्रो-लाइट एअरक्राफ्ट्स, पॅरा-ग्लाइडर्स, पॅरा मोटर्स, हँग ग्लायडर इत्यादी उड्डाण क्षमता असलेल्या संयंत्रे उडवण्यावर बंदीचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर व्भारतीय दंड संहिता कलम 183 नुसार कारवाई करण्यात येणार आहे.

आदेशानुसार, असामाजिक घटक, दहशतवादी ड्रोन आणि इतर उडणाऱ्या वस्तूंचा वापर करून जनतेच्या जीवाला धोका निर्माण करू शकतात, सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करत कायदा व सुव्यवस्था बिघडवू शकतात.अशा घटकांच्या कारवायांना राखण्यासाठी प्रतिबंधात्मक आणि सक्रिय उपाय आवश्यक असल्यामुळे या उपाययोजना करण्यात आल्याचे आदेशात म्हंटले आहे . पोलिसांनी घातलेली बंदी पुढील 30 दिवसांसाठी म्हणजेच 13 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर या कालावधीसाठी राहणार आहे.. मुंबई पोलिसांकडून हवाई पाळतीसाठी वापरण्यात येणारे ड्रोन या आदेशाला अपवाद आहेत.

Web Title: Drone Ban In Mumbai Till December 12 Mumbai Police Orders Issued

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiZGh0dHBzOi8vd3d3LmVzYWthbC5jb20vbXVtYmFpL2Ryb25lLWJhbi1pbi1tdW1iYWktdGlsbC1kZWNlbWJlci0xMi1tdW1iYWktcG9saWNlLW9yZGVycy1pc3N1ZWQtcGpwNzjSAQA?oc=5