मुंबई बातम्या

‘संजय राऊतांना झालेली अटक बेकायदेशीर’, मुंबई हायकोर्टाची सर्वात मोठी टिप्पणी – TV9 Marathi

मुंबई हायकोर्टाने संजय राऊतांच्या अटकेवर खूप महत्त्वाची टिप्पणी केलीय.

Image Credit source: tv9 marathi

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक मोठी घटना घडलीय. गेल्या तीन महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत कैद असलेले शिवसेनेते नेते संजय राऊत यांचा विशेष पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केलाय. संजय राऊत आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटासाठी हा खूप मोठा दिलासा मानला जातोय. राऊतांना जामीन मिळाल्यानंतर ईडीच्या वकिलांना त्यांच्या जामीनाला आव्हान देण्यासाठी मुंबई हायकोर्टात अर्ज केला होता. या अर्जात संजय राऊतांच्या जामीनाला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. पण मुंबई हायकोर्टाने ईडीची मागणी फेटाळली. विशेष म्हणजे मुंबई हायकोर्टाने खूप महत्त्वाची टिप्पणी केलीय.

संजय राऊत यांना झालेली अटक ही बेकायदेशीर आहे, असं हायकोर्टाने म्हटलं आहे. विशेष म्हणजे संजय राऊत यांनीदेखील कोर्टासमोर गेल्यानंतर प्रत्येक वेळा आमची अटक ही बेकायदेशीर असल्याचं म्हटलं होतं.

संजय राऊतांना कोणतंही कारण नसताना अटक केली, अशी टिप्पणी कोर्टाने केलीय. हायकोर्टाने विशेष पीएमएलए कोर्टाचा जामीन ऑर्डर वाचून ईडीचे कान टोचल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

PMLA कोर्टाच्या ऑर्डरमध्ये नेमकं काय म्हटलंय? :

संजय राऊतांना कुठलंही कारण नसताना अटक केली, असं ऑर्डरमध्ये सर्वात आधी म्हटलं आहे.

संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांना करण्यात आलेली अटक ही बेकायदेशीर आहे.

ईडीने प्रमुख आरोपी राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांना अटक केली नाही.

अनेक साक्षीदारांच्या जबाबातून वाधवान यांची मुख्य भूमिका समोर येतेय.

मात्र प्रवीण राऊत यांना दिवाणी वादासाठी अटक करण्यात आली.

या प्रकरणातील म्हाडाची भूमिका संशयास्पद वाटतेय. तरीही म्हाडाचा कुठलाही आरोप कर्मचारी आरोपी नाही.

जबाबदार एचडीआयएल, म्हाडा आणि सरकारी कर्मचाऱ्यांवर कुठलीही कारवाई केली नाही.

[embedded content]

दरम्यान, ईडीच्या वकिलांनी आपल्या अर्जावर आजच सुनावणी द्यावी, असा आग्रह केला. पण मुंबई हायकोर्टाने नियमानुसार आज सुनावणी होणार नाही. त्यामुळे उद्या सुनावणी होईल, असं सांगितलं. त्यामुळे ईडीच्या अर्जावर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे.

मुंबई हायकोर्टाने ईडीच्या वकिलांना फटकारल्यानंतर आता संजय राऊत आज जेलमधून बाहेर येतील हे निश्चित झालंय. ते आज संध्याकाळपर्यंत जेलमधून बाहेर येतील, अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. राऊतांच्या स्वागतासाठी शिवसैनिक आर्थर रोड कारागृहाबाहेर सज्ज झाले आहेत.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMicWh0dHBzOi8vd3d3LnR2OW1hcmF0aGkuY29tL21haGFyYXNodHJhL211bWJhaS1oaWdoLWNvdXJ0LWltcG9ydGFudC1jb21tZW50LW9uLXNhbmpheS1yYXV0LWFycmVzdC1hdTE3LTgyNjMzNC5odG1s0gEA?oc=5