राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना गेल्या 3 दिवसांपासून श्वसनाचा त्रास होत आहे. त्यामुळे त्यांना आज मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. भुजबळ यांची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे. कार्यकर्त्यांनी हॉस्पिटल परिसरात गर्दी करू नये असं आवाहन भुजबळ यांच्याकडून करण्यात आलं आहे.
शरद पवार यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज
दरम्यान, शरद पवार यांना ब्रीज कॅंडी हॉस्पिटलमध्ये 31 ऑक्टोबर रोजी दाखल झाले होते. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती खालावली होती.
(हेही वाचा – …आम्ही काय एकावर एक फ्री आहे का? राज ठाकरेंच्या टोलेबाजीने एकच हश्शा)
त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. 2 नोव्हेंबरला शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार होता.
(औरंगाबाद : पहिल्यांदाच दोन्ही गटाच्या प्रमुखांचे पुत्र आमने-सामने, आज आदित्य ठाकरे-श्रीकांत शिंदेंची सभा)
पण, तब्येत बरी नसल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला नाही. अशातच शिर्डीमध्ये राष्ट्रवादीचे मंथन शिबीर पार पडले. या शिबिराला डॉक्टरांच्या टीमसह शरद पवार हे हेलिकॉप्टरने शिर्डीला पोहोचले होते. तब्येत बरी नसल्यामुळे शरद पवार यांनी भाषण सुद्धा केलं नव्हतं. त्यांचं भाषण हे दिलीप वळसे पाटील यांनी वाचून दाखवलं होतं. अखेर आज शरद पवार यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMihgFodHRwczovL2xva21hdC5uZXdzMTguY29tL21haGFyYXNodHJhL211bWJhaS9uY3AtbGVhZGVyLWNoaGFnYW4tYmh1amJhbC13YXMtYWRtaXR0ZWQtdG8tdGhlLWJvbWJheS1ob3NwaXRhbC1pbi1tdW1iYWktbWhzcy03ODI5NTUuaHRtbNIBAA?oc=5