मुंबई बातम्या

Mumbai Fashion street Fire: मुंबईतील फॅशन स्ट्रीटवर आगीचं थैमान! दुकानांमधील साहित्य जळून खाक – India.com Marathi

Mumbai Fashion street Fire: मुंबईतील फॅशन स्ट्रीटला शनिवारी दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेत जवळपास डझनभर दुकानं जळून खाक झाली आहेत.

Mumbai Fashion street Fire: दक्षिण मुंबईतील शॉपिंग अव्हेन्यू फॅशन स्ट्रीटला शनिवारी दुपारी भीषण आग (Fashion street Fire) लागल्याची घटना घडली. ही आग दुपारी 1.02 वाजण्याच्या सुमारास लागल्याची (Massive Fire on Fashion Street in Mumba) माहिती आहे. बीएमसीनुसार, आगीची माहिती मिळताच अग्निशमन (Fashion Street in Mumbai) विभागाला माहिती देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीव नियंत्रण मिळवण्यात आले. आग लागली त्यावेळी आकाशात काळ्या धुराचे लोट दुरूनच दिसत होते एवढी मोठी ही आग होती.

Also Read:

ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. तसेच या आगीत किती नुकसान झाले हे देखील अद्याप समजले नाही. या प्रकरणी अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. दरम्यान या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती संबंधीत अधिकाऱ्यांनी दिली आहे. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. फॅशन स्ट्रीट हे कपडे खरेदीसाठी लोकप्रिय बाजारपेठ आहे आणि शहरातील प्रमुख पर्यटन स्थळांच्या अगदी जवळ आहे.

मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार फॅशन स्ट्रीटमधील दुकानांना लागलेली आग लेव्हल 1 ची होती. घटनास्थळी अग्निशमन दलाने तातडीने दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले. परंतु या आगीत डझनभर दुकानं जळून खाक झाल्याचे वृत्त आहे. एमएफबी, बीईएसटी, पोलीस आणि इतर संबंधित कर्मचारी घटनास्थळी उपस्थित आहेत. परिस्थिती सुरळीत होईपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आल्याचे मुंबई वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे.

चर्चगेटजवळ असलेल्या फॅशन स्ट्रीटवरील एका दुकानात दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली, त्यानंतही काही वेळातच या आगीत जवळची इतर दुकानंही आली. त्यामुळे येथील व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर
लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा
इतरही ताज्या बातम्या

Published Date: November 5, 2022 5:21 PM IST

Updated Date: November 5, 2022 5:28 PM IST

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMikAFodHRwczovL3d3dy5pbmRpYS5jb20vbWFyYXRoaS9tYWhhcmFzaHRyYS9tdW1iYWktZmFzaGlvbi1zdHJlZXQtZmlyZS1tYXNzaXZlLWZpcmUtb24tZmFzaGlvbi1zdHJlZXQtaW4tbXVtYmFpLWJ1cm4tbWF0ZXJpYWxzLXdpdGgtc2hvcHMtNTcyNTQ5My_SAQA?oc=5