मुंबई बातम्या

Mumbai Crime: मुंबई पोलिसांना पुन्हा एकदा अफवेचा फोन; हाजीअली येथे अतिरेकी येणार असल्याची अफवा – Saam TV (साम टीव्ही)

२० ऑगस्ट २०२२ ला देखील मुंबई पोलिसांना धमकीचा मॅसेज आला होता. यात 26/11 सारखा हल्ला करणार असल्याची धमकी अज्ञातांनी दिली होती. त्यावेळीही पोलिसांनी सर्व परिसर पिंजून काढला होता, मात्र हा फोनकॉल देखील खोटा आणि अफवेचा होता.

पोलिसांना अनेकदा असे फोन येत असतात. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून तात्काळ सुरक्षेचा आढावा घेतला जातो, तपासणी केली जाते. मात्र, नंतर अशा बातम्या खोट्या असल्याचं अनेकदा समोर आलं आहे.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMihwFodHRwczovL3d3dy5zYWFtdHYuY29tL211bWJhaS1wdW5lL3J1bW9yLWNhbGwtYWdhaW4tdG8tbXVtYmFpLXBvbGljZS1ydW1vcnMtb2YtdGVycm9yaXN0cy1jb21pbmctdG8taGFqaWFsaS1yZWFkLW11bWJhaS1jcmltZS1uZXdzLWFiOTXSAQA?oc=5