मुंबई बातम्या

Mumbai : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; अवैधरित्या राहणाऱ्या तीन बांग्लादेशी नागरिकांना केली अटक – Saam TV (साम टीव्ही)

मात्र, एक नोव्हेंबर या दिवशी तिघेही बांगलादेशी नागरिक अक्सा मशिदीजवळील सार्वजनिक सुलभ शौचालयाजवळ येणार असल्याचे पक्की खबर मिळाली.यानंतर पंच आणि कारवाईसाठी नेमलेली टीम अंधेरी पश्चिमेकडील जुहू गल्ली वायरलेस रोड जवळील सार्वजनिक सुलभ शौचालय जवळ पोहचून तीनही बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले यानंतर त्यांच्या बंद घराची झाडाझडती करून तपासणी केली.

मात्र, हे तीनही आरोपी पोट भरण्यासाठी मुंबईत (Mumbai) मागील सहा महिन्यापूर्वी दलालाच्या मदतीने कोलकत्ता आणि आगरताळा मार्गे जिथे संरक्षक कुंपण नाही अशा जंगली भागातून भारतात घुसले असल्याचे तीनही बांगलादेशी नागरिकांनी कबूल केले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMidWh0dHBzOi8vd3d3LnNhYW10di5jb20vbXVtYmFpLXB1bmUvYmFuZ2xhZGVzaGktbGl2aW5nLWlsbGVnYWxseS1pbi1tdW1iYWktYXJyZXN0ZWQtYnktbXVtYmFpLXBvbGljZS1sYXRlc3QtbmV3cy12dmc5NNIBAA?oc=5