मुंबई बातम्या

Mumbai-Mandwa Water Taxi: मुंबई-मांडवा वॉटर टॅक्सी आजपासून सुरू, आता अवघ्या 45 मिनिटांत होणार प्रवास – LatestLY मराठी‎

Water Taxi Service (Pic Credit – PTI)

मुंबई (Mumbai Tourism) आणि कोकण पर्यटकांसाठी (Konkan Tourism) एक आनंदाची बातमी आहे. मुंबई-मांडवा प्रवास (Mumbai-Mandwa) आता केवळ 45 मिनिटात करता येणार आहे. कारण आजपासून मुंबई-मांडवा वॉटर टॅक्सी (Mumbai Mandwa Water Taxi) सुरु करण्यात आली आहे. तरी या टॅक्सीच्या माध्यमातून अगदी कमी वेळात मुंबई मांडवा अंतर पार करता येणार आहे. मुंबई ते मांडवा दरम्यान वॉटर टॅक्सीने (Water Taxi) प्रवास करण्यासाठी प्रवाशांना खालच्या डेकसाठी ४०० रुपये, तर वरील डेकसाठी ४५० रुपये मोजावे लागणार आहेत. सध्या मुंबई मांडवा दरम्यान फेरी सुविधा उपलब्ध आहे. पण आता वॉटर टॅक्सी सुरु झाल्याने हा प्रवास अधिक सोयिस्कर होणार आहे. मुंबईहून अलीबागला (Alibaug) जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. तरी रस्ते मार्गाने गेल्यास जवळपास साडेतीन तास या प्रवासास लागतात. पण समुद्र मार्गे अवघ्या एका तासात हा प्रवास शक्य आहे. तरी वॉटर टॅक्सीच्या माध्यमातून तर केवळ ४५ मिनीटांत मुंबईहून मांडवा जाता येणार आहे.

 

नयनतारा शिपिंग कंपनीने (Nayantara Shipping Company) मुंबई ते मांडवा दरम्यान वॉटर टॅक्सी सेवा (Water Taxi Service) सुरू केली आहे. नव्याने सुरु करण्यात आलेल्या या टॅक्सीत वॉटर टॅक्सीमधील प्रवाशांची सोय लक्षात घेऊन ही वॉटर टॅक्सी तयार करण्यात आली आहे. यातून जवळपास २०० प्रवासी एका वेळी प्रवास करू शकतील. खालच्या डेकवर १४० प्रवासी तर वरच्या डेकवर ६० अशी आसन व्यवस्था आहे. तसंच या टॅक्सीमध्ये एसीचीही सुविधा आहे. (हे ही वाचा:- Mumbai Water Supply Cut: मुंबई मध्ये 1-10 नोव्हेंबर दरम्यान दहा टक्के पाणी कपात; BMC चं पाणी सांभाळून वापरण्याचं आवाहन)

 

मुंबई ते मांडवासाठी सकाळी १०.३०, दुपारी १२.५० आणि ३.१० अशा वेळेत ही सेवा असेल. तर मांडवा ते मुंबईसाठी सकाळी ११.४०, दुपारी २ आणि ४.२० या वेळेत वॉटर टॅक्सी असेल. प्रवाशांच्या प्रतिसादानुसार या वेळेत बदल केला जाऊ शकतो. तर तुम्हीही अलीबाग पर्यटनाचा विचार करत असल्यास वॉटर टॅक्सी हा सर्वोत्तम ऑप्शन आहे. प्रवासाच्या नियोजनापूर्वी तुम्ही घरबसल्या तुमच्या प्रवासाची बुकींग करु शकता.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiY2h0dHBzOi8vbWFyYXRoaS5sYXRlc3RseS5jb20vbWFoYXJhc2h0cmEvbXVtYmFpLW1hbmR3YS13YXRlci10YXhpLWlzLXN0YXJ0ZWQtZnJvbS10b2RheS00MTQ4ODguaHRtbNIBAA?oc=5