मुंबई बातम्या

Mumbai News : मुंबईकरांना महागाईचा झटका! पाण्यासाठी मोजावे लागणार जास्त पैसे, पाणीपट्टीत 7.12 टक्क्यांनी वाढ – India.com Marathi

Mumbai News : मुंबईकरांसाठी (Mumbaikar) महत्वाची बातमी आहे. मुंबईकरांना महागाईची झळ लागणार आहे. कारण मुंबईकरांचे पाणी महागले (Water Expensive) असून पाण्यासाठी त्यांना आता जास्त पैसे मोजावे लागणार आहे. मुंबई पालिकेने (BMC) पाणीपट्टीत सरसकट 7.12 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 नोव्हेंबरपासून म्हणजे उद्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. निर्णयाची अंमलबजावणी करण्यास प्रशासकीय मंजुरीही देण्यात आली आहे. मुंबई महानगर पालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) या निर्णयामुळे मुंबईकरांना झटका मिळाला आहे.Also Read – Morbi Bridge Collapse Video: मोरबी झुलता पूल दुर्घटनेत आतापर्यंत 140 जणांचा मृत्यू, घटनेचा धक्कादायक व्हिडिओ आला समोर!

सततच्या वाढत्या महागाईमुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, भाज्या महागल्यामुळे आधीच सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. त्यात आता आणखी भर पडली आहे. मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याचे दर वाढले आहेत. मंबईमध्ये वेगवेगळ्या निवासी भागांसाठी पाणीपट्टीचे वेगवेगळे दर आकारले जातात. मुंबई महानगर पालिकेने पाणीपट्टीमध्ये 7.12 टक्क्यांनी वाढ केल्यानंतर 1 नोव्हेंबरपासून मुंबईतील निवासी भागांतील नवीन दर हे वेगवेगळे राहतील. Also Read – Saffron Project : राज्यात चाललंय काय?, आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर; सॅफ्रन प्रकल्प गेला हैदराबादला!

कोरोना कालावधीत मुंबई महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट झाला होता. त्यामुळे हा खडखडाट भरुन काढण्यासाठी आणि निधी गोळा करण्यासाठी मुंबई महापालिकेने करवाढ केली आहे. मुंबई महापालिका प्रशासनाने 2012 मध्ये पाणीपट्टीत प्रत्येक वर्षी कमाल 8 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी त्याला मंजुरी दिली होती. त्या धोरणाच्या आधारे पालिका प्रशासनाकडून दरवर्षी पाणीपट्टीत वाढ केली जात आहे. यावर्षी मुंबईकरांच्या पाणीपट्टीत 7.12 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मुंबई पालिकेने पाणीपट्टीत केलेली 7.12 टक्के वाढ ही 16 जून 2022 पासून लागू असणार आहे. तर, घरगुतीसह व्यवसायिकांकडून ही दरवाढ नोव्हेंबर महिन्यापासून वसूल केली जाणार आहे. Also Read – Mumbai Local Mega Block: आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्यापूर्वी पाहा लोकलचे वेळापत्रक!

प्रत्येक विभागासाठी असे असणार पाणीपट्टीचे दर –

– झोपडपट्टी परिसरात पाणीपट्टीत 1 हजार लिटरमागे 5.28 रुपये दर आकारले जाणार आहेत. यापूर्वी 4.93 रुपये आकारले जात होते.

– इमारतींच्या पाणीपट्टीत 1 हजार लिटरमागे 6.36 रुपये दर आकारले जाणार आहेत. याआधी 5.94 रुपये आकारले जात होते.

– व्यवसायिक विभागात पाणीपट्टीत 1 हजार लिटरमागे आता 47.65 रुपये दर आकारले जातील. याआधी या विभागासाठी 44.58 रुपये आकारण्यात येत होते.

– गैरवाणिज्य विभागाची पाणीपट्टी 1 हजार लिटरमागे 25.26 रुपये दर आकारले जातील. याआधी याठिकाणी 23.77 रुपये आकारले जात होते.

– उद्योग तसेच कारखान्यांसाठी पाणीपट्टीत 1 हजार लिटरमागे आता 63.65 रुपये दर आकारले जातील. यापूर्वी याठिकाणी 59.42 रुपये दर आकारले जात होते.

– रेसकोर्स आणि फाईव्ह स्टार हॉटेलसाठी पाणीपट्टीत 1 हजार लिटरमागे 95.49 रुपये दर आकारले जाणार आहेत. याआधी याठिकाणी 89.14 रुपये दर आकारले जात होते.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMigAFodHRwczovL3d3dy5pbmRpYS5jb20vbWFyYXRoaS9tYWhhcmFzaHRyYS9tdW1iYWktbmV3cy1tdW1iYWlrYXJzLXdhdGVyLXJhdGVzLWhpa2UtNy0xMi1wZXJjZW50LWluY3JlYXNlLWluLXdhdGVyLXRhcmlmZi01NzE0NjkwL9IBAA?oc=5