मुंबई बातम्या

छप्परफाड रिटर्न देणारे 3 मल्टीबॅगर स्टॉक्स, फक्त 10 वर्षांत 1 लाखाचे केले 1 कोटी रुपये – Lokmat

शेअर बाजारात 3 कंपन्यांच्या शेअर्सनी गेल्या 10 वर्षांत गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. दीपक नायट्राइट (Deepak Nitrite), अल्काइल अमाइन्स केमिकल्स (Alkyl Amines Chemicals) आणि केईआय इंडस्ट्रीज (KEI Industries) असे या तिन्ही कंपन्यांची नावे आहेत. या कंपन्यांच्या शेअर्सनी गेल्या 10 वर्षांत गुंतवणूकदारांना तब्बल 10000 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. या 3 कंपन्यांच्या शेअर्सनी 1 लाख रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या लोकांना 1 कोटी रुपयांचे मालक बनवले आहे. 

दीपक नायट्राइटच्या शेअरनं 1 लाखाचे केले 1.1 कोटी – 
केमिकल कंपनी दीपक नायट्राइटच्या (Deepak Nitrite) शेयर्सनी गेल्या 10 वर्षांत 10000 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. या केमिकल कंपनीचे शेअर 19 ऑक्टोबर 2012 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेन्जमध्ये 19.08 रुपयांच्या पातळीवर होते. दीपक नायट्राइटचे शेअर 28 ऑक्टोबर 2022 रोजी बीएसईवर 2247.35 रुपयांच्या पातळीवर बंद झाले. जर एखाद्या व्यक्तीने 10 वर्षांपूर्वी दीपक नायट्राइटच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आता तीचे 1.17 कोटी रुपये झाले असते.

अलकाइल अमाइन्स केमिकल्सच्या शेअर्सनी 1 लाखाचे केले 1.06 कोटी –
अल्काइल अमाइन्स केमिकल्सच्या शेअर्सनी गेल्या 10 वर्षांत जबरदस्त परतावा दिला आहे. 9 नोव्हेंबर 2012 रोजी केमिकल कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेन्जवर (BSE) 27.89 रुपयांच्या पातळीवर होते. 28 ऑक्टोबर 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 2960 रुपयांच्या पातळीवर आहेत. जर एखाद्या व्यक्तीने 10 वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती कायम ठेवली असती, तर आज तिचे 1.06 कोटी रुपये झाले असते.

केईआय इंडस्ट्रीजच्या शेअर्सनी 1 लाखाचे केले 1.24 कोटी – 
केईआय इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअर्सनी 10 वर्षांपेक्षाही कमी कालावधीत जबरदस्त परतावा दिला आहे. 4 एप्रिल 2014 रोजी कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 12.86 रुपयांच्या पातळीवर होते. केईआय इंडस्ट्रीजचे शेअर्स 28 ऑक्टोबर 2022 रोजी BSE वर 1595.50 रुपयांवर बंद झाले. केईआय इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 4 एप्रिल 2014 रोजी एखाद्याने 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती आतापर्यंत कायम ठेवली असती, तर आता त्याचे 1.24 कोटी रुपये झाले असते.

(टीप – येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMipQFodHRwczovL3d3dy5sb2ttYXQuY29tL2J1c2luZXNzL25ld3MvbXVsdGliYWdnZXItc3RvY2stZGVlcGFrLW5pdHJpdGUtYWxreWwtYW1pbmVzLWNoZW1pY2Fscy1hbmQta2VpLWluZHVzdHJpZXMtdHVybmVkLXJzLTEtbGFraC10by1ycy0xLWNyb3JlLWluLWp1c3QtMTAteWVhcnMtYTY1My_SAbEBaHR0cHM6Ly93d3cubG9rbWF0LmNvbS9idXNpbmVzcy9zdG9jay1tYXJrZXQvbXVsdGliYWdnZXItc3RvY2stZGVlcGFrLW5pdHJpdGUtYWxreWwtYW1pbmVzLWNoZW1pY2Fscy1hbmQta2VpLWluZHVzdHJpZXMtdHVybmVkLXJzLTEtbGFraC10by1ycy0xLWNyb3JlLWluLWp1c3QtMTAteWVhcnMtYTY1My9hbXAv?oc=5