मुंबई बातम्या

उद्धव ठाकरेंना घेरण्यासाठी भाजपचं पुढचं पाऊल, मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी नव्या अभियानाची घोषणा – Maharashtra Times

मुंबई : महाराष्ट्रातील शिवसेनेचं बलस्थान म्हणून मुंबई महापालिकेच्या सत्तेकडे पाहिलं जातं. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपं पूर्ण ताकदीनं तयारी करत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मुंबई महापालिकेत पुन्हा सत्ता मिळू नये म्हणून भाजपनं जोरदार तयारी केली आहे. भाजपनं गेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. त्यावेळी शिवसेनेच्या जवळ ते पोहोचले होते. मात्र, राज्य सरकारमधील सत्तेला होणारा धोका लक्षात घेता भाजपनं मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्याचा विचार केला नाही. सध्या भाजपनं मुंबई महापालिकेत सत्ता मिळवण्याच्या दृष्टीनं वातावरण निर्मिती करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे.

शिवसेनेतील फूट भाजपच्या पथ्यावर पडणार?

महाराष्ट्राच्या राजकारणातील २०१७ ची शिवसेनेची स्थिती २०२२ मध्ये राहिलेली नाही. शिवसेनेच्या इतिहासातील आतापर्यंतचं सर्वात मोठं बंड झालं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह सेनेचे ४० आमदार, १२ खासदारांनी वेगळी भूमिका घेत भाजपसोबत राज्यात सत्ता स्थापन केली आहे. मुंबईतील खासदार राहुल शेवाळे, आमदार प्रकाश सुर्वे, सदा सरवणकर, यामिनी जाधव आणि दिलीप लांडे हे शिंदे गटात गेले आहेत. भाजपनं या स्थितीत शिवसेनेला मुंबई महापालिकेतील सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मुंबईत सणांच्या काळात वेगवेगळे उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे.

वरळीसारखं राष्ट्रवादीचा नेता सोबत न घेता स्वत: तीन टर्म जिंकलो, उदय सामंतांचा आदित्य ठाकरेंवर

भाजपनं गणेशोत्सव, दहिहंडीच्या काळात मुंबईत सर्वत्र आमचं सरकार आल्यानं सण उत्साहात साजरे होत असल्याची जाहिरात केली होती. नवरात्रोत्सवात भाजपकडून मराठी दांडिया कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. दिवाळीच्या काळात मुंबईतील वरळीतील जांबोरी मैदानात विविध कार्यक्रम मुंबई भाजपकडून आयोजित करण्यात आले होते. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज जागर मुंबई अभियान नोव्हेंबर महिन्यात सुरु करणार असल्याचं जाहीर केलं.

मुख्यमंत्री असताना मातोश्रीचा उंबरठा न ओलांडणारे आता…; भाजपचा उद्धव ठाकरेंना टोला

जागर मुंबई अभियानामध्ये नोव्हेंबर महिन्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या विरोधात वातावरण निर्मिती करण्याचा भाजपकडून प्रयत्न करण्यात येणार आहे. भाजपकडून शिवसेना ठाकरे गट जातीच्या, धर्माच्या जोरावर मत मागण्याचा प्रयत्न करतेय हे मतदारांसमोर मांडण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा मतदारांसमोर मांडणार असल्याचं आशिष शेलार म्हणाले.

विराट कोहली द. आफ्रिकेच्या सामन्यात रचू शकतो विश्वविक्रम, पाहा किती धावांची गरज

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMingFodHRwczovL21haGFyYXNodHJhdGltZXMuY29tL21haGFyYXNodHJhL211bWJhaS1uZXdzL2JqcC13aWxsLWxhdW5jaC1qYWFnYXItbXVtYmFpLWNhbXBhaWduLWluLW5vdmVtYmVyLWJlZm9yZS11cGNvbWluZy1ibWMtZWxlY3Rpb25zL2FydGljbGVzaG93Lzk1MTY5Nzk2LmNtc9IBAA?oc=5