मुंबई बातम्या

मुंबई : चार वर्षांच्या मुलीसोबत दुष्कृत्य करणाऱ्याला अटक – Loksatta

पापड देण्याच्या बहाण्याने ४ वर्षाच्या मुलीला घरी बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना बोरीवली पश्चिम येथे घडली. याप्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल असून २२ वर्षीय तरूणाला अटक केली. आरोपी पीडित मुलीचा नातेवाईक आहे.
पीडित मुलीला त्रास होत असल्यामुळे हा प्रकार उघड झाला. पीडित मुलीच्या आईने तिला विचारले असता तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानुसार आईने २२ वर्षीय आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत शुक्रवारी गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, आरोपीने पापड देण्याचे आमीष दाखवून पीडित मुलीला घरात बोलावले व त्यानंतर तिच्यासोबत दुष्कृत्य केले. घडलेल्या प्रकारानंतर पीडित मुलीला त्रास होऊ लागल्यामुळे तिला आईने विचारले. त्यावेळी तिने आरोपीचे नाव सांगून घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiZGh0dHBzOi8vd3d3Lmxva3NhdHRhLmNvbS9tdW1iYWkvZm91ci15ZWFyLW9sZC1naXJsLXJhcGlzdC1hcnJlc3RlZC1tdW1iYWktcHJpbnQtbmV3cy1hbXktOTUtMzIyMzExNi_SAQA?oc=5