मुंबई बातम्या

QS Rankings : क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्ज जारी, IIT Bombay देशात सर्वोत्तम तर IIT Delhi – ABP Majha

QS Rankings : क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्ज सस्टेनेबिलिटी 2023 चा (QS World University Rankings: Sustainability 2023) नवा अहवाल जारी झाला आहे. यानुसार आयआयटी बॉम्बे (IIT Bombay) ही भारतातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्था आहे. लंडनमध्ये नुकत्याच जाहीर झालेल्या क्रमवारीत रोजगारक्षमता, सामाजिक चिंता आणि पर्यावरणातील उत्कृष्टतेसाठी IIT बॉम्बेला भारतातील सर्वोच्च उच्च शिक्षण संस्था म्हणून मूल्यांकन करण्यात आले.

आयआयटी मुंबई (281-300 रँक) पहिल्या, त्यानंतर आयआयटी दिल्ली (321-340 रँक) आणि दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (JNU) तिसऱ्या क्रमांकावर (361-380) आहे. याशिवाय, पदवीधरांच्या रोजगारक्षमतेच्या बाबतीत जगातील टॉप 100 संस्थांमध्ये देखील आयआयटी बॉम्बेचा समावेश झाला आहे.

तर दुसरीकडे आयआयटी दिल्लीला (IIT Delhi) त्याच्या रोजगारक्षमता आणि पर्यावरणासाठी तर जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (JNU) ला लिंग समानता आणि इतर असमानता दूर करण्यासाठी क्रमवारीत स्थान देण्यात आले. स्पर्धा आणि शैक्षणिक स्वातंत्र्याच्या बाबतीत दिल्ली विद्यापीठ (Delhi University) भारतात चौथ्या क्रमांकावर आहे.

जेएनयूच्या कुलगुरुंकडून विद्यार्थी आणि शिक्षकांचं अभिनंदन
विद्यापीठाच्या क्रमवारीतील कामगिरीने जेएनयूचे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल मी जेएनयूच्या विद्यार्थी आणि शिक्षकांचे अभिनंदन करते, अशी प्रतिक्रिया जेएनयूच्या कुलगुरु प्राध्यापक संतश्री डी. पंडित यांनी दिली.

या क्रमवारीत, आयआयटी खरगपूरचा (IIT Kharagpur) 551-600 रँक श्रेणीमध्ये समावेश झाला आहे. आयआयटी खरगपूरने नियमित संशोधन प्रयत्नांमध्ये सर्वोच्च स्थान मिळवलं आहे. जीवनशैली आणि आरोग्य सुधारण्यासाठी विशेष पुढाकार घेणाऱ्या IIT खरगपूरचं जागतिक स्तरावर कौतुक होत आहे.

जागतिक स्तरावर अमेरिकेतील विद्यापीठांचं वर्चस्व
जागतिक स्तरावर, कॅलिफोर्निया विद्यापीठाला सर्वोच्च विद्यापीठ घोषित करण्यात आलं आहे, त्यानंतर टोरोंटो विद्यापीठ आणि ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठ अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे. 135 रँकिंग विद्यापीठांसह (एकूण 19.2 टक्के) या क्रमवारीत अमेरिकेचे वर्चस्व आहे. त्यापैकी 30 विद्यापीठांचा टॉप 100 मध्ये समावेश आहे.

त्याचप्रमाणे, क्रमवारीत 67 ब्रिटीश विद्यापीठांच्या समावेशासह यूके दुसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिका आणि ब्रिटननंतर ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीतील विद्यापीठांचा या क्रमवारीत समावेश आहे.

इतर महत्त्वाची बातमी

आयआयटी मुंबईमध्ये भारतातील पहिलं कार्बन कॅप्चर आणि युटिलायझेशनचं राष्ट्रीय केंद्र

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMilgFodHRwczovL21hcmF0aGkuYWJwbGl2ZS5jb20vZWR1Y2F0aW9uL3FzLXdvcmxkLXVuaXZlcnNpdHktcmFua2luZ3Mtc3VzdGFpbmFiaWxpdHktMjAyMy1paXQtYm9tYmF5LWJlc3QtaW4tZW1wbG95YWJpbGl0eS1paXQtZGVsaGktcmFua3Mtc2Vjb25kLTExMTUwMDTSAZoBaHR0cHM6Ly9tYXJhdGhpLmFicGxpdmUuY29tL2VkdWNhdGlvbi9xcy13b3JsZC11bml2ZXJzaXR5LXJhbmtpbmdzLXN1c3RhaW5hYmlsaXR5LTIwMjMtaWl0LWJvbWJheS1iZXN0LWluLWVtcGxveWFiaWxpdHktaWl0LWRlbGhpLXJhbmtzLXNlY29uZC0xMTE1MDA0L2FtcA?oc=5