लोणावळा : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर ( Mumbai Pune Expressway ) सकाळपासूनच मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. एचओसी ब्रीजपासून अमृतांजन पुलापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. दिवाळीसाठी घरी निघालेल्या प्रवासी आणि नागरिकांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
दिवाळीच्या सुट्ट्या सुरू झाल्याने अनेक जण आपल्या गावी जाण्यासाठी सकाळीच निघाले आहेत. मात्र, एक्स्प्रेसवेवार मोठ्या वाहनांमुळे मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुलांच्या परीक्षाही संपल्या आणि दिवाळीची सुट्टी सुरू झाली आहे. या कारणामुळे मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवरील बोरघाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. या वाहतूक कोडींचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
Pune : दिवाळीच्या पहिल्याच दिवशी दुर्दैवी घटना, पुण्यात तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू
दिवाळीच्या सुट्टीचा हा परिणाम असून मोठ्या प्रमाणात नागरिक आपल्या घराकडे निघाल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. रस्त्यावर वाहनांची संख्या वाढल्याने सकाळपासून एक्स्प्रेसवेवर वाहतूक कोंडी आहे. HOC ब्रिज अमृतांजन पुलापर्यंत वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
Pune : पुणे-नगर महामार्गावर बसला भीषण अपघात, बस उलटली; ४ जणांची प्रकृती गंभीर
Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMid2h0dHBzOi8vbWFoYXJhc2h0cmF0aW1lcy5jb20vbWFoYXJhc2h0cmEvcHVuZS1uZXdzL3RyYWZmaWMtamFtLW9uLW11bWJhaS1wdW5lLWV4cHJlc3N3YXktdG9kYXkvYXJ0aWNsZXNob3cvOTUwMDYyMTkuY21z0gEA?oc=5