मुंबई बातम्या

मुंबई व दिल्लीहून व्हिएतनामसाठी दोन उड्डाणे – Sakal

मुंबई व दिल्लीहून व्हिएतनामसाठी दोन उड्डाणे

मुंबई
sakal_logo

By

मुंबई, ता. २१ ः व्हिएटजेट विमान कंपनीने मुंबई व दिल्ली या शहरांमधून व्हिएतनाममधील विख्यात पर्यटनस्थळ दा नांग शहरासाठी दोन उड्डाणे सुरू केली आहेत. आतापर्यंत भारतातून व्हिएतनाममधील दा नांग शहरासाठी थेट विमानसेवा नव्हती. आता या सेवेमुळे पर्यटकांना तेथे थेट जाता येईल. या शहराजवळ पुरातन सांस्कृतिक स्थळे, सुंदर समुद्रकिनारे, हिलस्टेशन आहेत. हा विमानप्रवास चार तासांचा असून यादरम्यान प्रवाशांना अनेक सोयी-सुविधा मिळतील. या प्रवासाची तिकिटेही काही अटींसह सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत. मुंबईहून ही विमाने परतीच्या प्रवासासह सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी तर दिल्लीहून गुरुवार, शनिवार व रविवारी सुटतील.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b09529 Txt Mumbai

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiXmh0dHBzOi8vd3d3LmVzYWthbC5jb20vbXVtYmFpL3RvZGF5cy1sYXRlc3QtbWFyYXRoaS1uZXdzLW1iaTIyYjA5NTI5LXR4dC1tdW1iYWktMjAyMjEwMjExMjIwMTjSAQA?oc=5