मुंबई बातम्या

मुंबई: दिवाळीत मुंबईकरांचा ‘बेस्ट’ प्रवास होणार; ‘या’ मार्गांवर १६५ अतिरिक्त फेऱ्या चालवण्याचा निर्णय – Loksatta

मुंबई: दिवाळीत प्रवाशांचा प्रवास सुकर होण्यासाठी बेस्टच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. उपक्रमाने १६५ अतिरिक्त बस फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. दीपावलीच्या निमित्ताने मुंबईतील वीर कोतवाल उद्यान (दादर-प्लाझा), वांद्रे, महात्मा फुले मार्केट, काळबादेवी, एपीएमसी मार्केट (वाशी) यांसाह इतर बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिक मोठया गर्दी होते. या कालावधीत प्रवास अधिक सोयीचा करण्यासाठी बेस्ट उपक्रमाकडून  २३ ऑक्टोबरपर्यंत विविध बस मार्गावर २५ अतिरिक्त बस फेऱ्या होणार आहेत. तसेच २६ ऑक्टोबरला भाऊबीज आणि बलिप्रतिपदा एकाच दिवशी येत आहेत. या दिवशी मुंबई शहरांत विशेषतः पूर्व आणि पश्चिम या दोन्ही भागात, पश्चिम द्रुतगती मार्ग, भाईंदर, तसेच नवी मुंबईकडे जाणाऱ्या बसमार्गावर प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन बेस्ट उपक्रम १४० अतिरिक्त बस फेऱ्या चालवण्यात येणार आहे.

भाऊबीजेच्या दिवशी होणाऱ्या अतिरिक्त बस फेऱ्यांचे काही मार्ग

बॅक बे आगार ते माहुल एमएमआरडीए वसाहत इलेक्ट्रिक हाऊस ते टाटा पॉवर सेंटर

कमला नेहरू पार्क ते सँडहर्स्ट रोड स्थानक

वरळी आगार ते कन्नमवार नगर वरळी आगार ते कुलाबा आगार अँटॉप हिल ते गोरेगाव स्थानक पूर्व

कुर्ला स्थानक ते ऐरोली बस स्थानक

हुतात्मा चौक ते प्रतीक्षा नगर आगार

वरळी आगार ते प्रतीक्षा नगर आगार

राणी लक्ष्मीबाई चौक ते वैशाली नगर, मुलुंड

वांद्रे बस स्थानक पूर्व ते म्हाडा बस स्थानक मुलुंड

वांद्रे बस स्थानक पश्चिम ते दिंडोशी बस स्थानक

विक्रोळी बस आगार, सांताक्रुझ बस आगार ते दहिसर बस स्थानक

सांताक्रूझ बस आगार ते बोरिवली बस स्थानक

ट्रॉम्बे ते मॅरेथॉन चौक ठाणे, देवनार आगार ते बोरिवली स्थानक पूर्व

यासह अन्य मार्गावरही बेस्टच्या अतिरिक्त बस फेऱ्या होतील.

Source: https://www.loksatta.com/mumbai/diwali-best-trip-of-mumbaikars-decision-165-additional-rounds-various-routes-mumbai-print-news-ysh-95-3200474/