मुंबई बातम्या

Rain Updates: नवी मुंबई आणि पनवेलमध्ये धुवाँधार; पुढील तासाभरात मुंबईतही… – Sakal

महाराष्ट्र
sakal_logo

By

Navi Mumbai: कालच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. शिवाय पुढील तासाभरात मुंबईत जोरदार पाऊस बरसण्याचा इशारा हवामान खात्यानं दिलाय.

नवी मुंबई आणि पनवेलमध्ये सध्या जोरदार पाऊस कोसळतोय. हंगाम संपला तरी पाऊस काढता पाय घ्यायचं नाव घेत नाहीये. नवी मुंबई आणि पनवेल परिसरामध्ये जनजीवन विस्कळीत झालेलं असून सर्वत्र पाणीच पाणी झालेलं आहे.

हेही वाचा: Uddhav Thackeray : मशाल चिन्ह मिळताच ठाकरे आक्रमक; म्हणाले, मशालीनं आता…

पुढील तासाभरात मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस बरसण्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. आज (मंगळवारी) दुपारपासून मुंबईच्या आकाशामध्ये ढगांची दाटी झालेली आहे. त्यामुळे पाऊस बरसणार असंच दिसून येतंय. दरम्यान, राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी आज पावसाने हजेरी लावली.

Web Title: Maharashtra Rain Updates Mumbai Navi Mumbai Panvel

Source: https://www.esakal.com/maharashtra/maharashtra-rain-updates-mumbai-navi-mumbai-panvel-snk89