मुंबई बातम्या

Mumbai : मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई, दाऊद टोळीशी संबंधित 5 जणांना अटक – Sakal

मुंबई
sakal_logo

By

Mumbai Police Arrest D Gang People : मुंबई गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत दाऊद टोळीशी संबंधित 5 जणांना अटक केली आहे. खंडणी प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दाऊदचा जवळचा गँगस्टर छोटा शकील आणि रियाज भाटीला अटक केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

अजय गंडा, फिरोज लेदर, समीर खान, पापा पठाण आणि अमजद रेडकर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांच्या गुन्हे शाखेने अलीकडेच गँगस्टर छोटा शकील आणि मेहुणा सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रूट आणि रियाझ भाटीला खंडणी प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर आता मंगळवारी याच प्रकरणात आणखी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा: Palghar Case : शिंदे सरकारचा मोठा निर्णय; साधू हत्याकांडाचा तपास CBI करणार

वर्सोवा येथील एका व्यावसायिकाला धमकावून त्याच्याकडून 30 लाखांची कार आणि 7.5 लाख रुपयांची रोकड लुटण्यात या सर्वांची भूमिका समोर आल्याचे पोलिसांनी म्हणणे असून, अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चौकशीदरम्यान अधिक माहिती समोर येण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Mumbai Anti Extortion Cell Of Mumbai Crime Branch Arrested 5 People Associated With D Gang In Extortion Case

Source: https://www.esakal.com/mumbai/mumbai-anti-extortion-cell-of-mumbai-crime-branch-arrested-5-people-associated-with-d-gang-in-extortion-case-npk83