मुंबई बातम्या

MU Exam Postponed: मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा पुढे ढकलल्या – Maharashtra Times

Mumbai University Exam:मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट समोर आली आहे. विद्यापीठाअंतर्गत २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाचे द्वितीय सत्र म्हणजे हिवाळी सत्राच्या परीक्षा देणाऱ्या (Winter Session Exam) विद्यार्थ्यांसाठी ही माहिती महत्वाची आहे. या परीक्षा दि. १० ऑक्टोबर २०२२ पासून सुरू होणार होत्या. विद्यार्थ्यांनी या परीक्षांची पूर्णपण तयारी देखील केली होती. पण मुंबई विद्यापीठाकडून देण्यात आलेल्या अपडेटनुसार त्या सर्व परीक्षा (Mumbai University Exam) पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षेच्या नवीन तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील असे सांगण्यात आले आहे.

परीक्षा पुढे ढकलण्याबाबत काही महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे मागणी केली होती. त्यावर विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या मागणीवर सकारात्मक विचार करून २०२२ च्या हिवाळी सत्राच्या सत्र ५ बरोबरच सर्वच परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई विद्यापीठ २०२२ च्या हिवाळी सत्रामध्ये वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, मानव्य विद्याशाखा, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा व आंतरशाखीय विद्याशाखा अशा चार विद्याशाखेच्या ४५० पेक्षा जास्त परीक्षा घेणार आहे.

२०२२ च्या हिवाळी सत्राच्या परिक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार विद्यापीठाने या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षा दिवाळीनंतर घेण्याचे नियोजन आहे. सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल अशी प्रतिक्रिया डॉ. प्रसाद कारंडे यांनी दिली आहे.

Source: https://maharashtratimes.com/career/career-news/mumbai-university-winter-session-exams-postponed/articleshow/94642103.cms