मुंबई बातम्या

मुंबई एअरपोर्टवर 2.36 कोटींचे अंमली पदार्थ जप्त, आता मास्टरमाइंडच जाळ्यात अडकला – Saam TV (साम टीव्ही)

डीआरआयच्या तपासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. ही खेप अमेरिकेतून मागवण्यासाठी डार्क वेबचा वापर करण्यात आला होता. यासह, पेमेंट करण्यासाठी क्रिप्टो चलन वापरण्यात आले. या प्रकरणात दिल्लीतून 1.8 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. मुंबई आणि दिल्लीतून जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत २.३६ कोटी रुपये आहे.

डीआरआयने पकडले 1,476 कोटी रुपयांचे ड्रग्ज

विशेष म्हणजे, महसूल गुप्तचर संचालनालयाने एक दिवसापूर्वी नवी मुंबईतील वाशी येथे ड्रग्जची मोठी खेप जप्त केली होती. मुंबई डीआरआयने वाशीजवळ एका ट्रकमधून 198 किलो ड्रग्ज आणि 9 किलो कोकेन जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत अंदाजे 1,476 कोटी रुपये आहे.

Source: https://www.saamtv.com/mumbai-pune/drugs-worth-rupees-crore-seized-at-mumbai-airport-srt97