मुंबई बातम्या

दांडिया खेळण्यात सर्व दंग, मुंबई विमानतळावर घडली खळबळजनक घटना – News18 लोकमत

मुंबई, 02 ऑक्टोबर : मुंबईमध्ये नवरात्रीची धूम सुरू आहे. अशातच शनिवारी रात्री मुंबई विमानतळावर खळबळजनक घटना घडली. विमानतळावर एका विमानामध्ये बॉम्ब असल्याचा निनावी फोन आला. त्यामुळे उशिरापर्यंत हे विमान थांबवण्यात आले होते. अखेर काहीच न सापडल्यामुळे विमानाने पुन्हा उड्डाण केलं.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई विमानतळाला शनिवारी रात्री धमकीच्या मेल आला होता. या मेलमध्ये
मुंबई ते अहमदाबाद इंडिगो फ्लाईट 6E 6045 मध्ये बॉम्ब ठेवला असल्याची माहिती दिली होती. या मेलमुळे यंत्रणा अलर्ट झाली. सुरक्षा यंत्रणेनं तातडीनं या घटनेची दखल घेतली.

(Battery Blast Mumbai : धक्कादायक! इलेक्ट्रिक बाइकमधील बॅटरीच्या स्फोटात सात वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू)

तातडीने मुंबई ते अहमदाबाद विमान थांबवण्यात आले होते. त्यानंतर संपूर्ण विमानाची तपासणी करण्यात आली. पण काहीही आढळून आले नाही. त्यामुळे रात्री उशिरा विमानानं उड्डाण केलं. ह धमकीचा मेल आला कुठून आणि कुणी पाठवला याचा तपास पोलीस करत आहे. मुंबई पोलिसांच्या तांत्रिक विश्लेषण सेलने IP अड्रेसवरून मेल कुणी पाठवला याचा शोध घेतला जात आहे.
चोरी झाल्याचा खोटा फोन करणे तरुणाला पडले महागात

दरम्यान, चोरी झाल्याची खोटी माहिती डायल 112 वर देणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. भंडारा जिल्ह्याच्या गोसेखुर्द येथील तरुणावर पवनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकरणात गुन्हा दाखल होण्याची ही भंडारा जिल्ह्यातील पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे. विक्की नारायण बन्सोड (29) रा. गोसेखुर्द ता. पवनी असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

(महिलेने केनियाहून सँडलमध्ये लपवून आणले कोट्यावधींचे ड्रग्ज, मुंबई विमानतळावर येताच…)

काल (दि.01) शनिवारी सकाळी डायल 112 वर गोसेखुर्द येथे चोरी झाल्याचा कॉल आला. पवनी पोलिसांचे पथक तत्काळ गासेखुर्द येथे जाण्यास निघाले. आलेल्या फोनवर संपर्क करण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला तर तो बंद येत होता. काही वेळात पोलीस गावात पोहोचले. कॉल आलेल्या नावावरून पोलीस विक्कीच्या घरी पोहोचले. त्याला विचारपूस केली असता आपण कॉल केला नाही असे सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source: https://lokmat.news18.com/maharashtra/mumbai/a-mail-threatening-to-plant-a-bomb-in-a-plane-at-mumbai-airport-mhss-768346.html