मुंबई बातम्या

Government Job: मुंबई हायकोर्टात भरती, दरमहा ७८ हजार ते २ लाखांपर्यंत मिळेल पगार – Maharashtra Times

Bombay High Court Recruitment: तुम्ही कायद्याचे शिक्षण पूर्ण केले असेल आणि चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. बॉम्बे हायकोर्ट म्हणजेच मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court BHC) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

मेंबर ऑफ हायकोर्ट स्टाफ अॅण्ड सबॉर्डिनेट ज्युडिशियरी (Member of High Court Staff and Subordinate Judiciary)आणि प्रॅक्टीसिंग अॅडव्हॉकेट (Practicing Advocate)च्या एकूण ११ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

मेंबर ऑफ हायकोर्ट स्टाफ अॅण्ड सबॉर्डिनेट ज्युडिशियरी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २१ ते ४५ वर्षांदरम्यान असावे. उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून कायद्याचे शिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे पदवीनंतर मेंबर ऑफ हायकोर्ट स्टाफ अॅण्ड सबॉर्डिनेट ज्युडिशियरी पदाचा किमान ३ वर्षांचा अनुभव असावा.

प्रॅक्टिसिंग अॅडव्हॉकेट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २१ ते ३८ वर्षांदरम्यान असावे. उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून कायद्याचे शिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. या पदांसाठी निवड झालेल्या ७८ हजार ८०० ते २ लाख ९ हजार २०० पर्यंत पगार दिला जाणार आहे.

Scholarships for OBC: ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद
पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.

Work From Home करुन करा लाखोंची कमाई, महिलांसाठी सुवर्णसंधी
या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. तसेच उमेदवारांना संबंधित संस्थेने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.

१५ सप्टेंबर २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

कृषी विज्ञान केंद्रात भरती, पदवीधरांना ५६ हजार पगार मिळविण्याची संधी

Source: https://maharashtratimes.com/career/career-news/bhc-job-2022-vacancy-in-bombay-high-court-know-details/articleshow/94029514.cms