मुंबई बातम्या

Mumbai Custom Department : मुंबई कस्टम विभागाची मोठी कारवाई, चॉकलेटमधून तब्बल 19 लाखांची सोन्याची तस्करी – News18 लोकमत

मुंबई, अमीत राय (28 सप्टेंबर) : मुंबई कस्टम विभागाने मोठी कारवाई केली आहे. चॉकलेट आणि टॉफीमधून 19 लाखांच्या सोन्याची तस्करी करून  नेत असताना पकडण्यात यश आले आहे. जप्त केलेल्या सोन्याची किंमत 18 लाख 89 हजार 014 रुपये आहे. सोन्याची तस्करी करण्यासाठी, त्याचे तुकडे करून चॉकलेट आणि टॉफीच्या 2 थरांच्या रॅपरमध्ये गुंडाळले गेले होते, तसेच बॅगमध्ये एका पुठ्ठ्यात लपवले होते. जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये याची काळजी घेतली होती. अशापद्धतीने त्यांनी नियोजन केले होते. मात्र सीमाशुल्क विभागाने अत्यंत शिताफीने पकडले आहे.

दोन आठवड्यात दुसऱ्यांदा कारवाई

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबई सीमाशुल्क विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी विमानतळावरुन तब्बल 12 किलो सोनं जप्त केलं आहे. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत जवळपास 6 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. हे सोनं विदेशात घेऊन जाण्यात येत होतं.

हे ही वाचा : Kolhapur Crime : कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात चोरी, गर्दीत हात साफ करताना सीसीटीव्हीत कैद

सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका विशेष बेल्टची आतमध्ये लपवून हे सोनं विदेशात घेऊन जाण्यात येत होतं. मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी सूदान येथून आलेल्या 6 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. मुंबईत विमानतळावर सध्या याबाबत चौकशी केली जात आहे.

याआधी आठवडाभरापूर्वीच मुंबई विमानतळावरुन सोनं तस्करीची आणखी एक घटना समोर आली होती. यात मस्कतहून विमानानं आलेल्या एका प्रवाशानं कंबरेच्या पट्ट्यात दीड कोटींचं अडीच किलो सोनं लपवून आणलं होतं. मात्र, विमानतळावर पकडलं जाण्याच्या भीतीनं आरोपीनं शौचालयातील डस्टबिनमध्ये सोनं फेकलं.

हे ही वाचा : धक्कादायक! BHU मधील विद्यार्थिनीचा Yoga करताना अचानक मृत्यू; नेमकं काय घडलं पाहा

यानंतर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी त्याला बेड्या ठोकल्या होत्या. यानंतर आता पुन्हा एकदा सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावर मोठी कारवाई करत 6 कोटी रुपयांचं सोनं जप्त केलं आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source: https://lokmat.news18.com/maharashtra/mumbai/big-operation-mumbai-customs-department-gold-worth-19-lakhs-hidden-in-chocolate-sr-766855.html