मुंबई बातम्या

Mehmood Birth Anniversary: एकेकाळी अंडी विक्री आणि टॅक्सी चालवायचे अभिनेते मेहमूद, असे बनले कॉमेडी किंग – India.com Marathi

Mehmood Birth Anniversary: बॉलिवूडमध्ये कॉमेडीचा विषय आला की, ज्येष्ठ अभिनेते दिवंगत मेहमूद (Actror Mehmood) अली यांचे नाव आवर्जून घेतले जाते. त्यांना ‘कॉमेडी किंग’ (Comedy King Mehmood) म्हणून ओळखले जाते. आपल्या अनोख्या शैलीने, हावभावाने आणि आवाजाने मेहमूद अली यांनी तब्बल पाच दशके प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मात्र यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. अभिनेते-कॉमेडियन म्हणून आपला ठसा उमटवणारे मेहमूद यांचा जन्म 29 सप्टेंबर 1933 रोजी मुंबईत (Mumbait) झाला. त्यांचे वडील मुमताज अली बॉम्बे टॉकीज स्टुडिओमध्ये काम करायचे. घरची आर्थिक गरज भागवण्यासाठी महमूद मालाड ते विरार दरम्यान धावणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये गोळ्या-बिस्कीट आणि अंडी विकायचे. टॅक्सी ड्रायव्हर म्हणून ही त्यांनी काम केले होते.Also Read – Breast Cancer In Men: महिलांनाच नव्हे तर पुरुषांनाही होऊ शकतो स्तनाचा कर्करोग, ‘ही’ लक्षणे दिसताच व्हा सावध!  

स्टुडिओमध्ये जाण्यासाठी बनले टॅक्सी ड्रायव्हर

मेहमूद यांचा बालपणापासूनच अभिनयाकडे कल होता. वडिलांच्या शिफारशीमुळे मेहमूद यांना बॉम्बे टॉकीजच्या 1943 मध्ये रिलीज झालेल्या ‘किस्मत’ चित्रपटात बालकलाकार म्हणून संधी मिळाली होती. यावेळी त्यांनी अभिनेता अशोक कुमार यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती. दरम्यान, मेहमूद हे कार चालवणे शिकले आणि निर्माते ग्यान मुखर्जी यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून कामाला सुरुवात केली. कारण त्यांना स्टुडिओचे विशेष आकर्षण होते. यानंतर महमूद यांनी गीतकार गोपाल सिंग नेपाळी, भरत व्यास, राजा मेहंदी अली खान आणि निर्माता पी.एल. संतोषी यांच्या घरी ड्रायव्हर म्हणून काम केले. Also Read – World Heart Day 2022: दरवर्षी 29 सप्टेंबरला साजरा केला जातो जागतिक हृदय दिन, जाणून घ्या इतिहास

असं बदललं नशीब

‘नादान’ हा चित्रपट अभिनेते मेहमूद यांच्यासाठी नशीब बदलवणारा ठरला. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलग दहा वेळा रिटेक करूनही अभिनेत्री मधुबाला समोर एका ज्युनिअर आर्टिस्टला त्याचा डायलॉग बोलता आला नव्हता. तेव्हा खऱ्या अर्थाने मेहमूदचे नशीब चमकले. चित्रपट दिग्दर्शक हिरा सिंग यांनी मेहमूद यांना हा डायलॉग दिला आणि मेहमूद यांनी कुठलाही रिटेक न एकाच प्रयत्नात डायलॉग म्हटला होता. या चित्रपटासाठी त्यांना 300 रुपये ,मिळाले होते. दुसरीकडे ड्रायव्हर म्हणून मेहमूदला महिन्याला फक्त 75 रुपये मिळत होते. यानंतर मेहमूदने ड्रायव्हिंगची नोकरी सोडून ज्युनियर आर्टिस्ट असोसिएशनमध्ये नाव नोंदवले आणि चित्रपटात काम मिळवण्यासाठी धडपड सुरू केली. त्यानंतर दो बिघा जमीन, जागृति, सीआयडी, प्यासा यांसारख्या चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्या. मात्र करिअरला त्याचा पाहिजे तसा फायदा मेहमूद यांना मिळाला नाही. Also Read – Vinayak Chaturthi 2022: आज आहे विनायक चतुर्थी, जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि पूजा विधी

दरम्यान, महमूद यांनी हार न मानता संघर्ष सुरूच ठेवला आणि 1958 मध्ये आलेल्या ‘परवरिश’ चित्रपटात त्यांना चांगली भूमिका मिळाली. या चित्रपटात मेहमूदने राज कपूरच्या भावाची भूमिका साकारली होती. यानंतर एलव्ही प्रसाद यांच्या ‘छोटी बहन’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली, जो त्यांच्या करिअरसाठी महत्त्वाचा चित्रपट ठरला. छोटी बहन या चित्रपटात मेहमूदला 6000 रुपये मानधन मिळाले होते. या चित्रपटाच्या यशानंतर मेहमूद अभिनेता म्हणून प्रसिद्धीस आले. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पहिले नाही. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक चित्रपटांत काम करत अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या हृदयावर राज्य केले.

Source: https://www.india.com/marathi/entertainment/mehmood-birth-anniversary-mehmood-had-sold-egg-in-train-know-here-how-he-became-comedy-king-5658553/