मुंबई बातम्या

मुंबई- पुणे एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? मग आधी वाचा ही महत्त्वाची बातमी – Maharashtra Times

पुणेः एक्स्प्रेस वेने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मु गेल्या १५ दिवसांच्या कालावधीत राज्यातील महामार्ग सुरक्षा विभागातील (HSP) पुणे पथकाने २१ प्रवाशांवर मोठी कारवाई केली आहे. सीट बेल्ट न घातल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर विशेष मोहिमेदरम्यान अधिकाऱ्यांनी प्रत्येक प्रवाशाकडून २०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर, कारमधील मागील सीटवर तब्बल १९८ प्रवाशांनी सीट बेल्ट घातला नव्हता.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेने प्रवास करताना सीट बेल्टचा वापर न चुकता करा अन्यथा तुम्हालाही दंड बसण्याची शक्यता आहे. सायरस मिस्त्री यांच्या अपघातानंतर वाहतूक विभागाने ही मोहिम अधिक तीव्र केली आहे. एक्स्प्रेस वे व इतर महामार्गावर चालक व कारमध्ये मागे बसलेल्यानींही सीट बेल्ट वापरावे यासाठी ही जनजागृती मोहिम सुरू केली आहे. नियम मोडणाऱ्यांविरोधात आम्ही आमची कारवाई सुरूच ठेवू, असं पोलिस अधीक्षक लता फड यांनी म्हटलं आहे.

वाचाः सरकारी नोकरी मिळवली अन् गावचा शाप मिटवला; स्वातंत्र्यांच्या ७५ वर्षानंतर ‘या’ गावात साजरा झाला जल्लोष

चारचाकी वाहनांच्या सर्व प्रवाशांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी उर्से टोल नाका आणि खंडाळा घाट विभागात महामार्ग राज्य गस्ती पथके नेमण्यात आली आहेत. कार किंवा SUV च्या चालकांवर आम्ही यापूर्वीही नियमितपणे कारवाई करत होतो. आता, आम्ही कारमध्ये मागील सीटवर बसलेल्या प्रवाशांवर देखील कारवाई करत आहोत, असं फड यांनी म्हटलं आहे. जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान, आम्ही १,३८७ चालक आणि सीट बेल्टशिवाय प्रवास करणार्‍या बाजूच्या सीटवरील प्रवाशांना दंड आकारला आहे, असंही त्या म्हणाल्या.

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करणाऱ्या चालकांमध्ये जागरुकता निर्माण झाली आहे. मात्र, पुणे-अहमदनगर, पुणे-सोलापूर किंवा पुणे-कोल्हापूर यांसारख्या अन्य महामार्गांवर परिस्थिती वाईट आहे. या महामार्गांवर अनेक वाहनचालक सीट बेल्ट न लावता प्रवास करत आहेत. त्यामुळं आम्ही आता पुणे जिल्ह्यातील एक्सप्रेसवे आणि इतर महामार्गावरही जनजागृती मोहिम सुरू केली असून वाहनचालकांसह सहप्रवाशांनाही सीट बेल्ट लावण्याचे आवाहन केलं आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

वाचाः विदर्भ विकास मंडळाला तब्बल २९ महिन्यांनी मुदतवाढ; ११ वर्षांनी मंडळ ‘वैधानिक’, केंद्राला प्रस्ताव पाठवणार

गेल्या आठवड्यात HSP ने केलेली चांगली मोहिम हाती घेतली आहे. २०१८मध्ये HSPने अशीच मोहीम सुरू केली आणि अनेक ड्रायव्हर्सना सीटबेल्ट न लावल्याबद्दल कारवाई केली होती. तसंच, सीटबेल्टबाबत जनजागृतीदेखील करण्यात आली होती.मात्र, नंतर ही मोहिम थांबली होती. यावेळी ती दीर्घकाळ सुरू राहील अशी आशा आहे, असं रस्ते सुरक्षेसाठी काम करणाऱ्या एका कार्यकर्त्यांनी TOIला सांगितले आहे.

वाचाः १ ऑक्टोबरपासून मुंबईकरांचा प्रवास होणार अधिक सुखद; पश्चिम रेल्वेने घेतला मोठा निर्णय

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/220-e-way-drives-fined-in-7-days-for-violating-rear-seat-belt-rule/articleshow/94499818.cms