मुंबई बातम्या

Mumbai Crime : मनी हाईस्टप्रमाणे जबरी चोरी करायचे, मुंबई पोलिसांनी आवळल्या मुसक्या, तब्बल 50 गुन्ह्यांची नो… – News18 लोकमत

मुंबई, अमित राय (27 सप्टेंबर) : मुंबईत चोरीच्या गुन्ह्यात दिवसेदिवस वाढच होत आहे. दरम्यान सिनेस्टाईल चोरीच्या घटनेत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. परंतु मुंबई पोलिसांनी अत्यंत शिताफीने चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. चोरी करून पळून जाणाऱ्या चोरट्यांचा पोलिसांनी चांगलाच बंदोबस्त केला आहे. सिनेस्टाईलने पकडून चांगलाच चोप दिला आहे. तीन चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

मुंबई पोलिसांनी तीन चोरट्यांना पकडले आहे, हे तेच लोक आहेत जे मुंबईच्या वेगवेगळ्या भागात दरोडे घालून धुमाकूळ करत होते. दरम्यान ते वेगवेगळ्या पद्धतीने चोऱ्या करत असल्याने त्यांच्या चोरीची जोरदार चर्चा व्हायची. फिल्मी स्टाईलपेक्षा जबरदस्त पद्धतीने ते चोरी करत असल्याने त्याची चर्चा व्हायची. पहिल्यांदा ते काय करायचे ते ठरवायचे त्यानंतर ते कोणतीही कार किंवा ऑटो चोरायचे, ज्याचा वापर करून ते दरोड्याच्या ठिकाणी पोहोचायचे आणि गुन्हा करून पळून जायचे.

हे ही वाचा : PFI संघटनेभोवती फास आवळला, औरंगाबाद, नांदेडमध्ये ATS चे छापे, अनेक जण अटकेत

दरवेळी प्रमाणे यावेळेसही या टोळीने मालाड परिसरातील अलंकार शॉपिंग सेंटरला लक्ष्य केले होते. मुंबईतील रस्त्यांवरून ऑटो चोरून ते दरोडा टाकण्यासाठी ते जात होते. मात्र यावेळी त्यांचा हेतू पोलिसांना आधीच समजला आणि घटनास्थळी टोळीतील तीन दरोडेखोरांना पोलिसांनी ऑटोसह पकडले.

पोलिसांनी अटक केलेल्या या तिघांची झडती घेतली असता त्यांच्याकडून चोरीचे मोबाईल आणि शस्त्रे जप्त करण्यात आली, ज्याचा वापर करून त्यांनी चोरीचे गुन्हे केल्याची माहिती समोर आली आहे. अटक आरोपींविरुद्ध मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात 50 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत.

हे ही वाचा : Mumbai Chembur Crime : घटस्फोट देत नसल्याने पतीने गाठली खालची पातळी, धक्कादायक कारण समोर

50 हून अधिक केसेस डोक्यावर घेऊन मोकळेपणाने फिरणारे हे मुंबईतील दरोडेखोर किती मोठे आहेत, हे सांगण्यासाठी त्यांच्या गुन्ह्यांची यादीच पुरेशी आहे. ते बेधडकपणे ठिकठिकाणी दरोडे घालत होते. आता त्यांच्या गुन्ह्यांच्या वेगाला ब्रेक लागला आहे. मात्र पोलीस अजूनही त्यांचा आणि फरार झालेल्या तीन साथीदारांचा मोठ्या उत्साहात शोध घेत आहेत.

तुमच्या शहरातून (मुंबई)

मुंबई

मुंबई

Published by:Sandeep Shirguppe

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source: https://lokmat.news18.com/maharashtra/mumbai/forcible-theft-like-money-heist-mumbai-police-cracked-open-recorded-as-many-as-50-crimes-sr-766249.html