मुंबई बातम्या

मुंबई पोलिसांचा दाऊद इब्राहिमला दणका, अंधेरीत मोठी कारवाई – Maharashtra Times

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय आणि गँगस्टर रियाझ भाटी याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई क्राईम ब्रँचच्या खंडणी विरोधी विभागाने त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. मुंबईतील अंधेरी परिसरातून त्याला ताब्यात घेतलं आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून भाटी हा फरार होता.

मुंबई गुन्हे शाखेनं माहिती दिली की, त्याच्याविरुद्ध खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी देण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रूट आणि रियाझ भाटी यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shivsena vs Eknath Shinde: आमदार अपात्र ठरले तर काय करायचे; घटनापीठासमोर पेच, शिंदे गटाचे वकील म्हणतात….
वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी विभागाकडून केला जात होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाझ भाटी आणि छोटा शकील यांचे नातेवाईक सलीम फ्रूट यांनी अंधेरीतील एका व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी देऊन महागडी कार आणि ७ लाखांहून अधिक रुपये उकळले होते. व्यावसायिकाने जवळच्या वर्सोवा पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेच्या एईसी पथकाला रियाझ भाटी अंधेरी येथे एका ठिकाणी येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सापळा रचून भाटीला अंधेरी परिसरातून अटक करण्यात आली आहे. क्राईम ब्रँचनेही सलीम फ्रुटची एनआयए विशेष न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आज आरोपी भाटी याला पोलीस न्यायालयात हजर करणार असून त्याच्या कोठडीची मागणी करणार आहेत.

इंग्लंडची कर्णधार म्हणाली, भारताने आणि दीप्तीने खोटं बोलू नये; मंकडिंगवर नाईटचे धक्कादायक वक्तव्य

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/riyaz-bhati-aide-of-dawood-ibrahims-arrests-by-mumbai-crime-branch-for-extortion-case/articleshow/94476060.cms